सध्या राज्याचा खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत कृषी निविष्ठा आणि इतर साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी कृषी सेवा केंद्र आयुक्तांनी अलीकडेच केंद्र चालकांच्या प्रतिनिधींसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.
यामध्ये केंद्र चालक व कर्मचारी स्वतः लसीकरणापासून वंचित असल्याने हंगाम सुरू होण्यापूर्वी लसीकरणाचे समस्या सुटली पाहिजे अशा प्रकारचा मुद्दा केंद्र चालकांच्या प्रतिनिधीने मांडला. त्यामुळे आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे विक्रेते व कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाइन वर्कर चा दर्जा देत त्यांना प्राधान्याने लसीकरण करावे, अशा आशयाचा सूचना कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशकांचा पुरवठा करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कृषी सेवा केंद्रांना कोरोना मुक्त ठेवण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर समजले पाहिजे. त्यामुळे त्यांचे लसीकरण हे प्राधान्याने होऊनराज्यातील केंद्रीय वेळेत सुरू होतील शेतकऱ्यांना अखंडित सेवा प्रदान करता येईल असे आयुक्तांनी जिल्हाधिका-यांना कळविण्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्र चालक व कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्यांसोबत संपर्काचे प्रमाण सर्वात जास्त असते. त्यामुळे या घटकाला संसर्ग होण्याची शक्यता देखील अधिक आहे. लसीकरण न झाल्यास केंद्र चालक भरती होण्याची शक्यता असल्याने कृषी निविष्ठा पुरवठा बाबत माफदा सोबत झालेल्या चर्चेत आमच्या निदर्शनात आणून देण्यात आले आहेत असेही कृषी आयुक्तांनी एका पत्रात स्पष्ट केले आहे.
Share your comments