नवी दिल्ली: कृषी जागरण हे तीन दिवसीय शिखर परिषद आयोजित करणार आहे. ज्याची अधिकृत घोषणा 11 जून रोजी करण्यात आली. या शिखर परिषदेमध्ये “कृषी स्टार्टअप, सहकारी आणि FPO समिट”, हा कार्यक्रम 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान होणार आहे. कृषी स्टार्टअप्स, सहकारी संस्था आणि एफपीओ हे या कार्यक्रमाचे मुख्य केंद्र असतील.
तारखेची घोषणा करताना एम. सी. डॉमिनिक सर म्हणाले की, "कृषी स्टार्टअप, सहकारी आणि FPO हे तिन्ही क्षेत्र एकत्र आले तर ते कृषी क्षेत्रात मोठा बदल घडवून आणेल. डॉ. अजय, इंडो लॅटिन अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक म्हणाले की "आम्हाला शेतकरी आणि उद्योजकांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि हा कार्यक्रमासाठी एक व्यासपीठ म्हणून उदयास येईल".
प्रा. आंच्चल अरोरा म्हणाल्या, शेतकरी देश चालवतो. सरकार देश चालवत नाही. देश किती पण डिजिटल झाला तरी चपाती (रोटी) गुगल वरुन डाऊनलोड करु शकत नाही. आता बदल घडवायची हीच वेळ आहे. अँग्री स्टार्ट अँप्स वर काम करणे अत्यंत गरजेचे आहे.
कमल सोमानी म्हणाले (CEO & MD Somani Seeds), काही दिवसांनपूर्वी चांगली शेती, मध्यम व्यापार, कमी नोकरी अशी होती. पण आता परिस्थिती बदली आहे. आता चांगली नोकरी, मध्यम व्यापार, कमी शेती अशी झाली आहे. आज 10 ते 12 टक्के शेतकरी हुशार आहेत. इतर शेतकऱ्यांना पिकांची कधी आणि कशी करायची याची माहिती नाही. शेतकऱ्यांना या गोष्टींची माहिती देणे खूप गरजेचे आहे.
प्रा. अमित सिन्हा म्हणाले(Advisor AFC), शेतीमध्ये बदल घडवण्यासाठी आज शेतकऱ्यांना नविन तंत्रज्ञानाची गरज आहे. आता FPO यांची महत्त्वाची भुमिका असणार आहे. येणाऱ्या काळात FPO मध्ये चांगला नफा मिळू शकतो. शेतकऱ्यांची उन्नती करण्यासाठी FPO महत्त्वाचे आहेत.
प्रमोद मिश्रा (बिहार) म्हणाले (), सरकारने मोफत रेशन द्यायला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांनी शेती करणे कमी केले. असे चित्र काही ठिकाणीच पहायला मिळत आहे. AC मध्ये बसून शेती कळत नाही. शेतकऱ्यांसाठी काही तरी करायचे असेल तर शेतकऱ्यांच्या बांधावर जावे लागेल आणि तिथे गेल्यावरच
शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत, त्या समजणार आहेत.
हा कृषी जागरण कार्यालयात संपन्न झाला. कार्यकर्माचे सुत्रसंचलन कन्टेन्ट मॅनेजर श्रुती जोशी केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. पंत सर यांनी आभार मानले.
Share your comments