MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

कृषी वीज बिलामध्ये शेतकऱ्यांना मिळणार 66 टक्क्यांची सूट: महावितरण

राज्य शासनाच्या कृषी पंप विज जोडणी धोरणा नुसार शेतकऱ्यांना थकीत कृषी पंपाच्या वीज बिल मधून थकबाकी मुक्तता मिळावी यासाठी मूळ थकबाकी असलेल्या रकमेची तब्बल 66 टक्के सूट देण्यात येत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
elecricity

elecricity

राज्य शासनाच्या  कृषी पंप विज जोडणी धोरणा नुसार शेतकऱ्यांना थकीत कृषी पंपाच्या वीज बिल मधून थकबाकी मुक्तता मिळावी यासाठी मूळ थकबाकी असलेल्या रकमेची तब्बल 66 टक्के सूट देण्यात येत आहे.

यामध्ये  येत्या मार्च महिन्यापर्यंत सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रकमेचा भरणा जर केला तर उर्वरित संपूर्ण रक्कम माफ केली जाणार आहे अशी माहिती महावितरचे पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली.

 पुणे जिल्ह्यातील खोडद ( जुन्नर) येथे कृषी विभाग, महावितरण व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शेतकरी, महसूल व वीज ग्राहक यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शासनाच्या कृषी पंप विज जोडणी धोरणाची तपशीलवार माहिती देताना पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की राज्य शासनाच्या या धोरणामुळे शेतकरी बांधवांना कृषी वीज बिल यांमधून थकबाकी मुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

वीज बिलांच्या एकूण मूळ बाकी मधील व्याज व दंड तसेच महावितरणकडून  निर्लेखन अशी रक्कम वगळून वीजबिलांची सुधारित थकबाकी काढण्यात आली आहे. या थकबाकी मधील पन्नास टक्के रक्कम येत्या मार्च 2022 पर्यंत भरल्यास  संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे.

English Summary: agri electric bill pending farmer to give 66 percent discount in bill Published on: 04 January 2022, 09:04 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters