या कराराचा उद्देश आहे की देशातल्या बहुसंख्य शेतकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आयसीएआर च्या नेटवर्क मार्फत याची अंमलबजावणी करणे हा होय. गाव पातळीवर विविध कृषिविषयक बाबींना सहाय्य करण्यासाठी मल्टीमीडिया, बहुविध सल्ला आणि संवाद प्रणाली उभारण्यासाठी, आयसीटी मंच विकसित आणि उपयोगात आणण्यासाठी सहकार्य करणे बाबत भारतीय कृषी संशोधन परिषद आणि डिजिटल इंडिया कार्पोरेशन यांच्यात सहमती झाली आहे. यामध्ये अगदी सुरुवातीला भारतीय कृषी संशोधन परिषदत आय आय डी एस द्वारे शेतकऱ्यांकडून मोबाईल फोनचा वापर करत कृषिविषयक माहिती गोळा करता येणार आहे. शेतकऱ्यांनी ज्याची मागणी केली आहे अशी वैयक्तिक आवश्यकता वर आधारित माहिती प्राप्त करण्याचा पर्याय आय डी एस डी देईल.
शेतकऱ्यांना शंकांचे निरसन करताना तज्ञांना शेतकऱ्याचा डाटाबेस पाहणे शक्य राहील अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी तज्ञांकडे उपस्थित केलेल्या समस्या उत्तम पद्धतीने जाणून घेण्यासाठी आणि जलद गतीने त्यांचे निराकरण करण्यासाठी तोडगा सुचवण्यासाठी मदत होणार आहे.
सध्या आय आय डी एस मंच ईशान्येकडील राज्य, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मध्ये कार्यरत असून आय सी टी आर समवेत
झालेल्या सामंजस्य करारामुळे संपूर्ण देशभरात त्याचा विस्तार होणार आहे.
माहिती स्त्रोत – पुण्यनगरी
Share your comments