राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतल्यामुळे सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला जात आहे. तर महाविकास आघाडीने या निर्णयाचे समर्थन करत स्वागत केले आहे. राज्य सरकारला महाराष्ट्राच मद्यराष्ट्र करायचे आहे का? असा संतप्त सवाल भाजपने केला आहे. यामुळे रोज यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. असे असताना आता नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे आता चर्चा सुरु झाली आहे.
ते म्हणाले की, सरकार जर किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देत असेल तर शेतकऱ्यांना गांजाची शेती करायला परवानगी द्या, सरकारला दारू विक्रीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर गांजाच्या शेतीतूनही चांगले उत्पन्न होईल, असे म्हणत त्यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनाही लक्ष्य केले आहे. नवाब मलिकांच्या जावायाने हर्बल तंबाखूच्या नावाखाली गांजा उत्पादन केलेच आहे, त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, असे मत चिखलीकर यांनी व्यक्त केले आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे.
शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार का हे येणाऱ्या काळात समजणार आहे, मात्र याआधी राज्यात विरोधक आक्रमक झाले आहेत. या निर्णयामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाईल, असेही म्हटले जात आहे. मात्र वाईन आणि दारू यामध्ये मोठा फरक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. अनेक देशात वाइन पाणी म्हणून पितात असेही ते म्हणाले. यामुळे आता राजकीय तापले आहे. छगन भुजबळ यांनी देखील ज्याला प्यायचे आहे, तो कुठंही जाऊ शकतो, असे म्हटले आहे.
आता प्रताप पाटील चिखलीकर यांच्या या मागणीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीका केली आहे. वाईनचा निर्णय केवळ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी विरोधाला विरोध म्हणून गांजाची मागणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले आहेत. वाईन विक्रीचा निर्णय हा केवळ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला असून त्याचा अर्थ दारू प्या असा होत नाही, असेही ते म्हणाले. आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार का? हे देखील लवकरच समजणार आहे.
Share your comments