कोरोना काळात जनावरांचा बाजार सुद्धा बंद होता जो की याचा मोठा परिणाम आठवडी बाजारावर झाल्यामुळे आठवडी बाजार सुद्धा बंद पडले. मागील दोन दिवसात जो सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवून शर्यतीला जी परवानगी दिली त्यामुळे पुन्हा एकदा खिलार जातीच्या बैलांना पुन्हा एकदा महत्व प्राप्त झाले. जे बैलगाडा शर्यतीसाठी शौकिन आहेत ते खिलार जातीच्या बैलांची खरेदी करण्यासाठी घाई गडबड करू लागले आहेत. कोरोना काळात बैलांना २० ते ३० हजार रुपये देण्यास कोण तयारही न्हवते मात्र आता त्याच बैलांची किमंत लाखो रुपयांच्या घरात गेलेली आहे. या एका निर्णयाचा परिणाम किती मोठा झाला हे आपल्याला या वरून लक्षात येते.
जातिवंत खिलार बैलाला सर्वाधिक मागणी...
बैलगाडा शर्यतीमध्ये खिलार बैलाला खूप महत्व आहे कारण या बैलांशीवाय बैलगाडा शर्यत पार पडू शकत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे खिलार बैल आहेत त्याच्या किमती कोरोना काळात फक्त २० - ३० हजार रुपये होत्या मात्र आता याच बैलांची किमंत आता लाखो रुपयांमध्ये आहे. खिलार जातींच्या बैलांची मागणी सर्वात जास्त कोल्हापूर जिल्ह्यात आहे. अगदी थोड्याच प्रमाणातील शेतकऱ्यांकडे आता जातिवंत खिलार बैल आहेत.
लॅाकडाऊन पासून कमालीचा शुकशुकाट...
कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाने राज्यात जे लॉकडाउन करण्यात आले याचा परिणाम शेतीवर कमी पण जनावरांच्या खरेदी विक्री वर खूप झाला. आठवडे बाजार बंद पडल्याने जनावरांच्या किमती पूर्णपणे ढासळल्या गेल्या. तसेच शेतीच्या कामासाठी आता शेतकरी आधुनिक यंत्राचा वापर करत आहेत त्यामुळे जनावरांचे महत्व शेतीसाठी कमी झाले आहे. जनावरे म्हणजे सर्वात जास्त यामध्ये बैलांनवर परिणाम झाला आणि याच काळामध्ये खिलार जातींच्या बैलांची किमंत मागेल त्या भावाने करण्यात आली.
ही तर सुरवात, दुपटीने दरवाढ होणार...
मागील दोन दिवसात शर्यतीवरील जी बंदी उठली त्यामुळे या दोन दिवसात बैलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली तसेच किमती तर लाखो रुपयांमध्ये जाऊन पोहचल्या. सध्या शर्यतीचे शौकिन किमतीचा कोणताही विचार न करता खिलार जोड आहे का हेच विचारत आहे. अजून शर्यतिचे आयोजन सुद्धा करण्यात आले नाही तो पर्यंत खरेदी विक्री सुरू झाली. शर्यतीला सुरूवात झाली की खिलार जातीच्या बैलांच्या किंमतीमध्ये दुपटीने वाढल्या जाणार आहेत.
Share your comments