News

राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागात तर पावसाने थैमान घातले असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा मुक्या प्राण्यांना बसत आहे. पावसात भिजून तर कधी हवेतील गारव्यामुळे जनावरे आजरी पडत आहेत.

Updated on 14 July, 2022 7:17 AM IST


राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागात तर पावसाने थैमान घातले असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा मुक्या प्राण्यांना बसत आहे. पावसात भिजून तर कधी हवेतील गारव्यामुळे जनावरे आजरी पडत आहेत. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावरही तोडगा काढला आहे. त्यांच्या कल्पनेची राज्यात चांगलीच चर्चा होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राजूर गावात गेल्या काही दहा-बारा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र अशापरीस्थीतही आदिवासी भागातील शेतकऱ्यांना शेळ्यांना रानावनात चराईसाठी न्यावे लागत आहे. शेळ्यांचेही वारा आणि पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांनी चक्क खतांच्या गोण्यांपासून घरीच रेनकोट तयार केला. पहिल्यांदाच शेळ्यांना रेनकोट घालण्याचा प्रयोग पहायला मिळत असल्याने सगळेचजण आश्चर्यचकित झाले आहेत.

अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्य ठाकर समाजातील कुटुंब हे शेळीपालन व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात. कुमशेत शिरपुंजे, धामनवन, आंबित, हेंगाडवाडी, घाटघर, उडदावणे, पांजरे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेळी पालक आहेत. या भागात मुसळधार पाऊस पडल्याने हवेत गारठा निर्माण झाला आहे.

ओळख संप्रेरकांची:जिब्रेलीन आणि त्याचे फायदे

जंगलात चरण्यासाठी सोडलेल्या शेळ्या कधी पावसात भिजून तर कधी गारठ्यामुळे आजारी पडतात. कधी कधी अति गारठ्यामुळे शेळ्या मरण पावतात. या सगळ्यांपासून शेळ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शेळ्यांच्या पाठीवर खतांच्या मोकळ्या गोण्यापासून बनवलेले रेनकोट बांधण्यात आलेले आहेत. यामुळे शेळ्यांच्या केसांमध्ये पाणी जात नाही शिवाय पावसाचे पाणी या बांधलेल्या गोण्यांवरून निथळून खाली पडते. आणि अशा प्रकारे वाऱ्यापासून आणि पावसापासून त्यांचा बचाव होतो.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! अखेर शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार
रेशन कार्डचा नवीन नियम आला; 'या' अपात्र शेतकऱ्यांना त्वरित करावं लागणार रेशनकार्ड सरेंडर

English Summary: Admirable! Homemade raincoat from manure bags for goats
Published on: 13 July 2022, 04:48 IST