1. सरकारी योजना

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! अखेर शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार

शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिवसाची वीज देण्याची मागणी करत होते. अनेकांनी यासाठी आंदोलन देखील केले होते. रात्रीच्या विजेमुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Biggest announcement for farmers

Biggest announcement for farmers

शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिवसाची वीज देण्याची मागणी करत होते. अनेकांनी यासाठी आंदोलन देखील केले होते. रात्रीच्या विजेमुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांनी सर्व सोलर पंप अर्जांना मंजुरी मिळणार असल्याची घोषणा देखील केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा देखील मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना खर्च कमी आणि उत्पादन जास्त मिळणार आहे. यामुळे ही योजना एक फायदेशीर ठरणार आहे. यावर सरकारकडून अनुदान देखील दिले जात आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज मिळत नव्हती. काही शेतकऱ्यांचे वीज बिल भरले नसल्यामुळे कनेक्शन तोडण्यात आले होते. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली होती. तसेच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात होते. यामुळे शेतकरी आक्रमक झाला होता. मात्र आता त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

याला म्हणतात खरी कृतज्ञता!! बेंदूर सणादिवशी बैलांचा त्रास कमी होण्यासाठी तयार केले अनोखे जुगाड

देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानस बोलून दाखवला आहे की, शेतकऱ्यांना आपल्याला दिवसा वीज द्यायची आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील सांगितले गेले. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत कोल्हापूरमध्ये अनेकदा आंदोलन केली होती.

महत्वाच्या बातम्या;
... आणि डोळ्यासमोर आख्ख गाव वाहून गेलं! राज्यात पावसाचा हाहाकार
video: गाईने खाटिकाला दिली भयंकर शिक्षा, दोरीने बांधल्यामुळे फरफटत नेल, आणि...
अवघडच झालं! पैसे वाटूनही सरपंचपदाची निवडणूक हरले, मतदारांकडून पुन्हा केली ४ लाखाची वसुली

English Summary: Biggest announcement for farmers! After all, farmers will now get electricity during the day Published on: 13 July 2022, 04:33 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters