काही दिवसांपूर्वी अभिनेते निसर्गप्रेमी असणारे सयाजी शिंदे यांच्या कल्पनेतून उभा राहिलेल्या सह्याद्री देवराईला भीषण आग लागली. यामुळे यामध्ये अनेक झाडे जळून खाक झाली. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. आगीत जवळजवळ 500 झाडं जळाली. आगीबद्दल वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहेत. या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेक निसर्गप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत. ही झाडे मोठी करण्यासाठी मोठे कष्ट करण्यात आले होते. यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले. याठिकाणी दुष्काळ पडत असल्याने अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईची स्थापना केली होती.
आता ही झाडे जळाल्याने यावर सयाजी शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, अशाप्रकारच नुकसान पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती केली आहे. राज्यभरामध्ये तुम्ही सह्याद्री वनराईच्या माध्यमातून वृक्ष चळवळ सुरू केली आहे. एकीकडे तुम्ही काम करत असताना दुसरीकडे सातत्याने सह्याद्री वनराईचे नुकसान केले जात आहे. प्रयत्न करणं ही सर्वांची जबाबदारी आहे. ही एवढी मोठी जागा असते त्यात चुकून कोणीतरी आग लावतो. त्यांना हात जोडून विनंती आहे की असे करू नका. यामुळे संपुर्ण मानवजातीचे नुकसान होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणजे की हे सगळं काम आपण आनंदासाठी करतोय. नम्र व्हावं कोणापुढे तर झाडापुढे व्हावं या हेतून आपण सर्वजण काम करतोय. तसेच ते म्हणाले, आपण पैसा मिळवून बघतो, गाड्या घेऊन बघतो पण शेवटी उपयोगाला कोण येतं तर ऑक्सिजन. उपयोगाला कोण येतं तर झाडं आणि त्यांनी दिलेलं अन्न. जगात कोणीही कोट्याधीश असला तरी तो अन्न तयार करतो का? ती जादू फक्त झाडालाच येते. यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचा फायदा कोणाला एकाला होणार नसून सगळ्यांना होणार आहे.
यामुळे आपण झाडांशी नम्र राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. दरम्यान या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक झाडे जळाली आहेत. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या झाडांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला होता. सगळ्यांनी जर आपल्यापासूनच झाडे लावायला सुरुवात केली तर येणाऱ्या काळात याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
Share your comments