रेशन दुकान बंद राहिल्यास होणार कारवाई

Thursday, 26 March 2020 10:34 AM


आपल्या मनमानी पद्धतीने रेशन दुकान उघडणाऱ्या दुकानदारांना शासनाने तंबी दिली आहे. निर्धारित वेळेत दुकाने न उघडल्यास आणि ग्राहकांना माल देता परत पाठवल्यास तसेच दर्शनी भागात सूचना फलक न लावल्यास कारवाई करण्याचे आदेश अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

दुकानदाराकडून ग्राहकोपयोगी वस्तूचे वेळेत नियमित आणि दररोज वाटप होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात विभागाकडे दाखल झाल्या आहेत.  या तक्रारी टाळण्यासाठी शासनाने नऊ मार्च रोजी परिपत्रक काढून रेशन दुकानदारांना दुकान संपूर्ण वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रेशन दुकानदारांकडून ग्राहकोपयोगी वस्तूचे वाटप सुस्थिती होण्यासाठी दुकाने सकाळी व दुपारी प्रत्येक चार तास उघडी ठेवण्यात यावीत.  स्थानिक परिस्थितीनुसार या बाबतच्या नेमकी वेळ अप्पर जिल्हाधिकारी, नियंत्रण शिधा वाटप मुंबई यांनी निश्चित कराव्यात असे आदेशात म्हटले आहे.  तसेच ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरत असतो, अशा ठिकाणी आठवडा बाजाराच्या दिवशी रास्त भाव दुकाने पूर्ण वेळ उघडी ठेवण्यात यावीत.  तर विविध कारखाने, उद्योगधंदे असलेल्या ठिकाणी त्याच्या साप्तहिक सुट्टीच्या दिवशी रास्त भाव, शिधावाटप दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यात यावीत आदी सुचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

ration shop ration card अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभाग maharashtra government रेशन दुकान स्वस्त धान्य दुकान

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.