Sugarcane : राज्यातील साखर कारखाने (Sugar Factory) शेतकऱ्यांची लूट करत आहेत असा आरोप विविध शेतकरी संघटनांकडून केला जात होता. यामुळे आता आयुक्तांचा (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) धडाकेबाज निर्णय घेतला आहे.
राज्यातील साखर कारखान्यांना ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी किती पैसै मोजायचे, याचे दरपत्रक साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. साखर कारखान्यांकडून ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च जास्त घेतला जातो, असा आरोप शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांकडून केला जात होता.
त्यामुळं शेतकऱ्यांना ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चाची माहिती व्हावी यासाठी आयुक्तांनी हे दर जाहीर केले आहेत. ठरलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
IMD Alert : पुढच्या दोन दिवसात राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखाने शेतकऱ्यांचा ऊस ऊसतोड कामगार पाठवून गाळपासाठी घेऊन जतात. त्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून वजा केला जातो. मात्र, साखर कारखाने तोडणी आणि वाहतुकीसाठी येणारा खर्च वाढवून दाखवतात असा शेतकरी संघटनांचा आरोप आहे.
आता पती-पत्नी दोघांना मिळणार 6,000 रुपये! पीएम किसान योजनेचे नवीन नियम जाणून घ्या
या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील 200 साखर कारखान्यांचे प्रती मेट्रिक टन ऊसाचे तोडणी आणि वाहतुकीचे दरपत्रक जाहीर केलं आहे.
या दरपत्रकात नमुद करण्यात आलेली रक्कमच कारखाने शेतकऱ्यांच्या बीलातून वजा करु शकणार आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना स्वतः चा ऊस तोडून साखर कारखान्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यांना तशी मुभा देण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8वा वेतन आयोग लागू होणार! जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
Share your comments