राज्यात मागील काही महिन्यांपासून हातभट्टी विरोधी मोहीम राबवली जात आहे. राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविण्याबाबत शासन स्तरावरून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या गावांना प्रोत्साहनपर बक्षीसही देण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पुणे विभागातील उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी विभागातील सर्व गावांमध्ये हातभट्टी निर्मिती नष्ट करण्यासाठी काटेकोरपणे कारवाई करावी.
शासन लवकरच हातभट्टी मुक्त गाव अभियान धोरण आणणार आहे. पुणे विभागात हातभट्टी दारू विरुद्ध १ एप्रिल २०२३ ते २७ ऑगस्ट २०२३ पर्यंत २००४ गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत.
कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता विकासासाठी विशेष कृती योजना, 1 हजार कोटींना मंजुरी
यामध्ये पुणे जिल्ह्यात ९७५, अहमदनगर ४०७, सोलापूर ५११ व विभागीय भरारी पथक १११ अशी गुन्ह्यांची संख्या आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी अधिकारी देखील उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील 'या' ७ तालुक्यात बैलगाडा शर्यत बंद! प्रशासनाचा निर्णय, लम्पीचा प्रादुर्भाव वाढला..
पुणे विभागाच्या महसुलात मागील वर्षीपेक्षा यावर्षी १३ टक्के वाढ झालेली आहे, त्याप्रमाणेच गुन्हे अन्वेषणाचे प्रमाणात १५ टक्के वाढ झालेली आहे. येणाऱ्या काळात यावर अनेक निर्णय घेण्यात येणार आहेत.
अजितदादा शब्दाला पक्के! माळेगाव साखर कारखान्याने दिला राज्यात सर्वाधिक 3411 रुपये दर..
राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती, सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांच्या खात्यात 210 कोटी येणार, शेतकऱ्यांना दिलासा
Share your comments