ठाणे
समृद्धी महामार्गावर अपघात सत्र मालिका सुरुच आहे. मागील काही दिवसांपूर्वी बुलढाण्याजवळ झालेल्या बस अपघाताची घटना ताजी असतानाचा आणखी एक अपघात झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात महामार्गाचे काम सुरु असताना गर्डर मशीन कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती समजातच तात्काळ राज्याचे रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळास भेट दिली आहे. गर्डर मशिनखाली दाबले गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास प्रथम प्राधान्य देत आहोत. ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल. तसेच मृतांच्या कुटुंबियांना मदत देखील केली जाईल, असे आश्वासन देखील दादा भुसे यांनी दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळला आहे. यात १७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ५ ते ६ जण जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मु्ख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Share your comments