बुलडाणा जिल्ह्यात दि. 20 रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार मोर्चा पार पडला. सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.आमच्या हक्काचे निर्णय जर मंत्रालयात घेतले जाणार नसतील तर ते काय कामाचं? सरकारला आम्ही धारेवर धरणारच.२७ नोव्हेंबर पर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा राज्यभरातील हजारो शेतकरी २९ नोव्हेंबरला मंत्रालयात घुसून मंत्रालयाचा ताबा घेतील असा इशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी सरकारला दिला आहे.
पिवळा मोझॅक, बोंड अळी व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी प्रतीएकर १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ९ हजार व कापसाला किमान १२ हजार ५०० रुपयांचा भाव गरजेचा आहे. शासनानं कोणतीही अट न ठेवता संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशीही मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.यासंदर्भात सरकारनं आठ दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा २९ नोव्हेंबरला आम्ही मंत्रालय ताब्यात घेऊ, असा इशारा तुपकरांनी दिला.
या महाएल्गार मोर्चा वेळी सोयाबीन आणि कापसाला दरवाढ मिळावी.चालू वर्षाची पीकविम्याची अग्रिम व १०० टक्के पीकविमा भरपाई मिळावी. वन्यजीवांचा उपद्रवामुळे शेतीचे नुकसान होते यासाठी शेतीला तारांचे किंवा सिमेंटचे मजबूत कंपाउंड मिळावे अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या महामोर्चापूर्वी रविकांत तुपकर यांनी एल्गार रथयात्रा देखील काढली होती. या रथयात्रेला शेतकऱ्यांकडुन मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता २९ नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेऊ, असा इशारा तुपकरांनी दिल्याने सरकार यासंर्दभात काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Share your comments