1. बातम्या

येवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ

येवला तालुका म्हणजे दुष्काळाचा तालुका, जे की येवला तालुका म्हणले की लोक त्या तालुक्याकडे दुष्काळ तसेच पाण्याची टंचाई असलेला तालुका म्हणून बघतात. येवला तालुका मधील शेतकरी दुष्काळ असून सुद्धा त्यांच्या पीक घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल करत आहेत जे की पारंपरिक पिके जसे की मका, सोयाबीन, कांदा, कपाशी याचबरोबर अल्प पाण्यावर जी पिके घेतली जातात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
vegetable

जसे की कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, तिखट मिरची, टोमॅटो, कोथंबीर या भाजीपाल्याच्या शेतीकडे(farming)  सुद्धा तेथील शेतकरी  ओळत आहेत मोठ्या प्रमाणित आकर्षित होत आहेत त्यामुळे येवला तालुक्यातील शेतकरी वर्गाची एक आदर्श ओळख निर्माण  झालेली आहे. कसमा, दिंडोरी  तसेच निफाड या पट्यामधील जे शेतकरी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेतात त्या भाजी पाल्यावर नाशिक पिंपळगाव बसवंत बाजार  समिती  कब्जा करत असते.आपल्या ताब्यात घेत असते परंतु सध्या पाहायला गेले तर येवला तालुक्यामधील शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या  शेतामध्ये  कोबी, फ्लॉवर, टोमॅटो,  ढोबळी मिरची, कोथिंबीर तसेच तिखट मिरची या भाज्यांची लागवड करून उत्पन्न घेत आहेत त्यामुळे याना मोठ्या प्रमाणात बाजारभाव भेटत आहेत.

हेही वाचा:सोलापूरच्या शेतकऱ्यांना स्युमिन्टर इंडिया ऑरगॅनिकने दिले सेंद्रिय ऊस उत्पादनाचे प्रशिक्षण

आणि मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल सुद्धा होणार असल्याचे चित्र आपल्याला समोर दिसत आहे. आजकाल पाहायला गेले तर तरुण वर्ग आपले शिक्षण आवरून नोकरीच्या मागे न धावता शेतीकडे आपला दर्जा ओळवत आहे.तसेच आपले वेगवेगळ्या प्रकारचे स्किल वापरून आधुनिक प्रकारे शेती  करत आहे आणि मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे त्यामुळे अत्ता नाशिक मधील शेतकरी राज्यात तसेच परराज्यामध्ये सुद्धा भाज्यांची विक्री  करत  आहे.

कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन:

येवला तालुक्यामध्ये सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील नदी, विहीर, ओढे, नाले पूर्णपणे कोरडे आहेत त्यामुळे शेतीला पुरेसे पाणी भेटत नसल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी तिथे असणारे शेततळे तसेच विहीर मध्ये असणारे थोड्या प्रमाणात पाण्याने तुषार सिंचन, ठिबक सिंचन व मल्चिंग पेपर या साधनांचा वापर करून कमी पाण्यावर भाजीपाल्याची शेती करत आहेत.कमीतकमी २ वर्ष झाले कोरोनाचा संसर्ग अजूनही जगात थैमान मांडत आहे त्यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि तरुण वर्ग पूर्णपणे शेतीकडे ओळला एवढंच काय तर आपले नवीन नवीन प्रयोग वापरून तरुण वर्ग शेती करत आहे.

नर्सरीमध्ये रोपांची बुकिंग:

पूर्वी आपण पाहिले तर शेतकरी आपल्या शेतामध्ये रोपे तयार करून त्याची लागवड करत होता पण अत्ता शेतकरी नर्सरी मध्ये रोपे बुक करून ज्या दिवशी लागवड करणार आहेत त्या दिवशी रोपे आणत आहे.

English Summary: Acceleration for vegetable cultivation in Yeola taluka, increase in area under vegetable cultivation Published on: 02 August 2021, 05:30 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters