यंदा उन्हाळ्याचा कडाका खूपच वाढला असून विदर्भात तापमान 45 अंशाच्या पुढे गेले आहे. हवामान विभागाकडून देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तापमानाचे प्रमाण वाढतच असून, सध्या उकाड्यापासून सुटकेसाठी पंखा आणि कूलरची हवा देखील कमी पडत आहे. तापमान वाढल्यामुळे एसी खरेदी वाढली आहे.
पण एसी महाग असल्याने अनेकांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे आज पंख्याच्या किमतीत मिळणाऱ्या स्वस्त एसीबद्दल माहिती घेणार आहोत.तुम्ही अगदी कमी किमतीत हा एसी खरेदी करून उन्हामुळे होणाऱ्या गर्मी पासून थंडगार होऊ शकता आणि हा उन्हाळा सुखद घालवू शकता. अॅमेझॉनवर मिनी एसीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हा एसी फक्त पंख्याएवढ्या किमतीत मिळत आहेत.लुचिला गो आर्क्टिक एअर कंडिशनर हा एसी 3 इन 1 एसी आहे. त्याला ह्युमिडिफायर प्युरिफायर मिनी कूलर असंही म्हटलं जातं.
या एसीची किंमत ४४९९ रुपये आहे.परंतु सध्या या एसीवर ऑफर सुरू आहे. त्यामुळे तुम्ही फक्त १८९९ रुपयांमध्ये हा एसी खरेदी करू शकता. हा पोर्टेबल एसी खूप हलका आहे. म्हणजे काय वजनाचा आहे. त्यामुळे तुम्ही तो सहजरीत्या कुठेही नेऊ शकता त्याची जागा बदलू शकता.
या एसीचा आवाजही जास्त येत मी त्यामुळे तुमची झोपमोड होणार नाही. या एसीच्या थंडगार वातावरणात तुम्ही शांत झोप घेऊन तुमचा उन्हाळा चांगला बनवा.या एसीमधली हायड्रो चिल टेक्नॉलॉजी इव्हॅपोरेटिव्ह एअर कूलिंग फिल्टरच्या माध्यमातून गरम हवा आत ओढून घेते आणि त्या हवेचं थंड हवेत रूपांतर करून बाहेर फेकते. हा एसी अतिशय वेगाने तुमची खोली थंड करेल.
खोलीतली हवा ताज्या हवेत रूपांतरित केली जाते व यामध्ये मल्टि डायरेक्शनल एअर व्हेंट्स आहेत. म्हणजेच हा एसी तुम्ही सोबत नेऊ शकता आणि तुम्हाला हवं तिथे ठेवून तुम्ही थंड हवा घेऊ शकता.या एसीचा आकार लहान आहे. त्यामुळे तुम्हाला तो ऑफिस,लिव्हिंग रूम, किचन किंवा बेडरूममध्ये कुठंही बसवू शकतो. या एसी ला कमी वीज लागते त्यामुळे तुमचे वीजबिल कमी येईल. खिशाला परवडणारा हा एसी वीजेची बचत करून तुमच्या खिशाचा भार कमी करेल एवढं नक्की. याबत झी न्यूजन वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहात का? तर तुम्हाला मिळेल या योजने व्यतिरिक्त अजून एक महत्वाचा फायदा
गाय आणि म्हशीच्या कानातील 'आधार कार्ड' टॅगमुळे शेतकऱ्यांचा फायदा! मिळतो 'या' योजनांचा फायदा..
Share your comments