
the climate change
सध्या अतिवृष्टी,अवकाळी पाऊस आणिढगाळ वातावरण ही परिस्थिती नित्याची होऊन बसल्यासारखे झाली आहे. त्याचा अनिष्ट परिणाम हा शेती क्षेत्रावर होत आहे.
राज्यात मागील काही दिवसांचा म्हणजेच मागच्या वर्षीचा नोव्हेंबर महिना आणि जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा त्याचा विचार केला तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये वादळी वारे पाऊस व गारपीट झाली. यामुळे राज्यातील जवळजवळ दोन लाख 58 हजार तर फळपिकांचे अतोनात नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.जर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचा विचार केला तर हे थंडीचे प्रमुख महिने आहेत. परंतु या महिन्यांमध्ये देखील राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक फरकाने वादळी वारा सोबत चांगलाच पाऊस बरसला.
यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर, पुणे,कोकण, विदर्भ आणि औरंगाबाद व लातूर विभागात नैसर्गिक आपत्तीत पहिल्या पंधरवड्यात सोळा जिल्ह्यात आणि 28 व 29 डिसेंबर च्या अवकाळी पावसाने पुन्हा पंधरा जिल्ह्यातील एकूण दोन लाख तीन हजार 106 हेक्टरवर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले. जानेवारी महिन्याच्या पहिल्या तेवीस दिवसात 32.8 टक्के पाऊस पडला. यामध्ये पुन्हा अकरा जिल्ह्यातील 54 हजार 960 हेक्टरदोन लाख 58 हजार सहासष्ट हेक्टरवरील गहू, ज्वारी,मका, भात इत्यादी पिकांचे तर फळबागांमध्ये केळी, आंबा, द्राक्ष, डाळिंब कलिंगड व विविध प्रकारचा भाजीपाला व फळ पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
या वातावरणाचा परिणाम आंबा फळबाग आवर मोठ्याप्रमाणात झाला असून ढगाळ वातावरण व आतमधून पडणारा पाऊस यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे हापूस आणि केसर आंबा उत्पादन 15 टक्क्यांपर्यंत घट याचा प्राथमिक अंदाज आहे.
Share your comments