गेल्या काही दिवसांपासून कांद्याला बर्यापैकी भाव मिळून शेतकऱ्यांच्या हातात थोडेफार पैसे येत होते. परंतु केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी घोषित करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे. प्रतिकूल वातावरणात कांदा सोडून खराब होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतकरी राजाने कांदा पटकन विकून पैसा मोकळा करून घेण्याकडे कल दाखवलेला दिसतो. अशा गंभीर परिस्थितीत मेहनतीचे अधिक दोन पैसे पदरात पडावे, म्हणून भाववाढीच्या अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत अभोणा उपबाजार आवारात बुधवारी 325 ट्रॅक्टरमधून सुमारे पाच हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन कमाल ३५०० रुपये भाव मिळाला.
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागल्याने सर्वत्र कांद्याचे बाजारभाव कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचे अश्र उपसले आहे. शेतकरी राजासमोर कांद्याचे होणारे नुकसान ही त्रासदायक ठरू लागले आहे. कांदा जरी चाळीत ठेवला तरी तो खराब होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तो विक्रीसाठी आणला जात आहे. त्यामुळे येथे आवक टिकून आहे. साधारणतः बुधवारी सुमारे 325 ट्रॅक्टर मधून 5 हजार क्विंटल आवक झाली.
बुधवारी मिळालेला भाव किमान 200 ते कमाल 3500 रुपये होता व सरासरी 2500 रुपये भाव मिळाला. केंद्र सरकारने केलेली निर्यातबंदी त्वरित उठवावी अशी, मागणी शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात आली. अभोणा उपबाजार गुरुवारी सर्वपित्री अमावस्या असल्याने सकाळ व दुपारच्या सत्रातील कांदा लिलाव दुपारी दोन वाजता सुरू होतील याची कांदा उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांनी दखल घ्यावी असे आवाहन उपसचिव रवींद्र पवार यांनी केली आहे.
Share your comments