माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे सिल्लोड येथे आयोजन करण्यात आले होते. पण यावेळी काही हुल्लडबाजाकडून कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम करण्यात आले. म्हणून कार्यक्रमातील हुल्लडबाजावर लाठीचार्ज करण्याचे आदेश अब्दुल सत्तार यांनी दिल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. तसंच यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. यादरम्यान अब्दुल सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच माझ्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी खेद व्यक्त करतो, असंही अब्दुल सत्तार म्हणालेत.
यावेळी सत्तार म्हणाले की, सिल्लोडमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला आणि बालक होते. तसंच काही लोकांना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पाठवून कार्यक्रम बंद करण्याचा प्रयत्न होतो. म्हणून अशा लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मी आमच्या ग्रामीण भाषेत बोललो. यामुळे कुणाच्या मनात शंका-कुशंका निर्माण झाली असेल तर, मी दिलगिरी व्यक्त करतो, तसंच कुणाचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो " असे सत्तार म्हणालेत.
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा १ जानेवारी जन्मदिवस असतो. त्यानिमित्ताने सिल्लोडमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमाला गौतमीचे चाहते आणि सत्तार यांचे कार्यकर्ते एकत्र आले. प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे यावेळी काही हुल्लडबाजांकडून कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम करण्यात आले. म्हणून सत्तार संतापले. मग सत्तार यांनी थेट स्टेजवरुन उपस्थितांना अश्लिल भाषेत सुनावले. तसंच पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे देखील मंत्री महोदय यांनी आदेश दिले.
दरम्यान, सत्तार एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढे एवढंही म्हटलं की बघताय काय त्यांना एवढं हाना की त्यांची हाडे तुटली पाहिजेत. त्यांच्या गांXX फटके टाका. माणसांची औलाद आहे माणसासारखा कार्यक्रम बघा. तसंच आणखी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी भाषा वापरली. यामुळे आता त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली आहे. तसंच विरोधकांकडून त्यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे.
Share your comments