कृषी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वेगळ्या प्रकारचे संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित होत आहे.या संशोधनाच्या आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन तर वाढत आहेच परंतु पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील भर पडत आहे.
शेती क्षेत्रामध्ये विविध पिकांच्या जाती विकसित करण्यावर आणि विविध संशोधनासाठी कृषी विद्यापीठांचे मोलाची भूमिका आहे. कृषी विद्यापीठे हे सातत्याने कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संशोधन करण्यामध्ये गुंतलेलेआहेत. परंतु कृषी विद्यापीठां सोबतच काही अकृषी विद्यापीठ देखील संशोधनात मोलाची भूमिका पार पाडताना दिसतात. असेचएक संशोधन राज्यातील शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागातील संशोधकांनी केली आहे मध्ये त्यांनी तांदळाच्या सुगंधी वानांमध्ये प्रसिद्ध असलेल्या आजरा घनसाळ आणि काळा जिरगा या प्रचंड मागणी असलेल्या तांदळाच्या वानांच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत.
या मागील पार्श्वभूमी
शिवाजी विद्यापीठाचे वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. एन. बी. गायकवाड म्हणाले की,कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाताचे देशी वाण आहेत.हेवान ग्राहकांना खूप मोठ्या प्रमाणात आवडणारे असून व्यापाऱ्यांमध्ये तसेच ग्राहकांकडून यांना प्रचंड मागणी असते.
यामध्येच आजरा घनसाळ आणि काळा जिरगा या दोन प्रसिद्ध वान असून यामध्ये खनिजे आणि इतर पोषक तत्वे खूप मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना बाजारपेठेत देखील खूप मागणी आहे. तसेच या दिवशी वानांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यांची उंची अधिक असते तसे उत्पन्न अल्पप्रमाणात येते.तसेच परिपक्व होण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो त्यामुळे यांची लागवड खूप कमी प्रमाणात केली जाते. हीच समस्या लक्षात घेऊन प्रा. गायकवाड आणि आदी विभागातील संशोधक विद्यार्थी शीतल कुमार देसाई आणि अकेशजाधव यांनी या दोन देशी वानांच्या अनुवंशिक गुणांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा तसेच त्यांचे उत्पादन वाढवण्याचा संशोधन प्रकल्प हाती घेतला.
यासाठी डीएई- बीआरएनएस, मुंबई आणि डीएसटी-एस ई आर बी, नवी दिल्ली यांनी या देशी भाताच्या वानांच्या सुधारीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुक्रमे 32 लाख व 40 लाख रुपयांचा निधी दिला होता. विविध प्रकारच्या म्युटेजेनिक एजंट्सचा वापर करून या पिकांच्या सहा पिढ्यांच्या चाचण्या घेतल्या. या चाचण्यांमधून अधिक उत्पादन देणारे, लवकर परिपक्व होणारे व कमी उंचीचे व आडवे न पडणारे वाण विकसित करण्यात संशोधकांना यश आले.
Share your comments