1. बातम्या

काय सांगता! नाशिक जिल्ह्यातील "या" शेतकऱ्याचा कांद्याचा भरलेला ट्रॅक्टर गेला चोरीला

यावर्षी शेतकऱ्यांना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अतिवृष्टीने (Heavy Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. त्यानंतर अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) देखील शेतकऱ्यांचे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातून शेतकरी (Farmer) कसाबसा सावरत आहे, मात्र आता त्याने पिकवलेल्या शेतमालावर भुरटे चोर (Thief) डल्ला मारताना दिसत आहेत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Onion

Onion

यावर्षी शेतकऱ्यांना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अतिवृष्टीने (Heavy Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. त्यानंतर अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) देखील शेतकऱ्यांचे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातून शेतकरी (Farmer) कसाबसा सावरत आहे, मात्र आता त्याने पिकवलेल्या शेतमालावर भुरटे चोर (Thief) डल्ला मारताना दिसत आहेत. 

यामुळे अजूनच शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आधीच शेतकरी राजा आसमानी आणि सुलतानी संकटामुळे पूर्ण मेटाकुटीला आला आहे, आणि त्याच्या संकटात भुरट्या चोरांनी अजूनच वाढ केली आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सिन्नर तालुक्यात कांद्याची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री तीनच्या सुमारास कांदा चोरीची घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.

सिन्नर तालुक्यातील पूर्ण दातली गावाचे कांदा उत्पादक शेतकरी आनंदा गबाजी भाबड यांचा कांदा सोमवारी मार्केट साठी ट्रॉलीत भरला होता, मात्र मार्केटला नेण्याआधीच कांद्यावर चोरांनी हात साफ केला त्यामुळे आनंदा चांगलेच चिंतेत सापडले आहेत. आनंदा यांनी न्यू हॉलंड ट्रॅक्टर मध्ये कांदे भरून आपल्या घरासमोर ट्रॅक्टर लावले होते. मात्र चोरांनी कांदा समवेत ट्रॅक्टर ट्रॉली देखील लंपास केली.

केव्हा समजली चोरीची घटना (When did the incident of theft come to light?)

आनंद सकाळी पहाटे उठले आणि त्यांना ट्रॅक्टर नजरेस पडला नाही, तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे समजले. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात ट्रॅक्टरची शोधाशोध केली, मात्र ट्रॅक्टर काही गावला नाही.

हतबल झालेल्या या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि कांदा चोरीची तक्रार नोंदवली.आनंदा यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, त्यांना खोपडी रोडकडे जाताना रस्त्यावर कांदा पडलेला दिसला आहे, आणि त्यामुळे त्यांना कांदा चोर त्याच दिशेने गेले असल्याचा संशय आहे. ही माहिती त्यांनी पोलिसांना देखील कळवली आहे आणि पोलीस ह्या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. सदर घटनेमुळे परिसरात शेतकऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांना आता वावरात गस्त घालण्याचा सल्ला देखील दिला जात आहे.

English Summary: A tractor full of onions of this farmer from Nashik district was stolen Published on: 27 December 2021, 09:39 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters