राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) सध्या मुसळधार पावसाचा (Heavy Rain) चांगलाच फटका बसला आहे. तसेच बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. उन्हाळी कांदा अद्यापही शेतकऱ्यांच्या दारात भाव नसल्याने पडून आहे. त्यामुळे अक्षरशः शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाशिम (Washim) जिल्ह्याला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील एका संतप्त शेतकऱ्याने थेट वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावरच (WASHIM COLLECTOR OFFICE) पोस्टर लावून न्याय देता का कधी भेटू? असा प्रश्न विचारला आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ग्राम अंचळ येथील दिव्यांग शेतकरी बाबुराव वानखेडे (Baburao Wankhede) हे आपली शेतजमिन मिळवण्यासाठी गेल्या बारा वर्षापासून लोकशाही व्यवस्थेनुसार प्रशासनाशी लढत आहेत.
सोने खरेदीला करू नका उशीर, 10 ग्रॅम सोने मिळतंय फक्त 29758 रुपयांना; पहा 14 ते 24 कॅरेटचे दर...
या शेतकऱ्याने न्याय मिळावा आणि सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी थेट जिल्ह्याधिकारी कार्यालयावरच पोस्टर (poster) लावल्याने वानखडे चर्चेत आले आहेत. सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष देईल वेळ नाही मात्र निवडणुकीसाठी सज्ज आहे. सरकार शेतकऱ्यांना नुसती आश्वासन देत आहे मात्र कोणतीच पूर्ण होत नाहीत.
आमची सहनशिलता संपली आहे. उखाळ्या, पाखाळ्या, कुरघोड्या बंद करा, शेतकऱ्यांना भिक नको, कुत्रे आवरा, रक्षकच झाले भक्षक, वाशिम जिल्ह्यातील भ्रष्टाचारी प्रशासनाचा नंगानाच बंद करा अशा आशयाचे पोस्टर लावून त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे.
या पोस्टरमध्ये शेतकरी बाबुराव वानखेडे यांनी त्यांच्या फोटोसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावला आहे. नुकसान होऊनही शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
वाहनधारकांनो पेट्रोल-डिझेलच्या नवीन किमती जाहीर! येथे मिळतंय सर्वात स्वस्त पेट्रोल..
खरीप पिके (Kharip Crop) वाया गेल्याने शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न शेतकरी सरकारला विचारत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे हाल लावले आहेत. निसर्ग कोपल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अशा स्थितीत सरकार मात्र, शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे मत शेतकरी बाबुराव वानखेडे यांनी व्यक्त केले. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे, तरीदेखील अद्याप शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत शासनाने जाहीर केली नसल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे.
सरकारच लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावे यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोस्टर लावले असल्याचे बाबुराव वानखडे यांनी सांगितले आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर मदत द्यावे असा मत वानखेडे यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
हिवाळ्यात या भाज्यांची लागवड करा आणि बंपर उत्पन्न कमवा; आरोग्यासही आहेत लाभदायक
गव्हाच्या या देशी वाणाची योग्य वेळी पेरणी केली तर कराल मोठी कमाई; पावसातही राहते सुरक्षित
Share your comments