टाकाऊ शेतमालाचे तुम्ही जर कोळशात रूपांतर केले तर तो विक्री योग्य इंधनाचा एक प्रकार तयार होतो. जैवभार तापवला की त्याचे चांगल्या प्रकारे विघटन होऊन त्यामधून जवळपास ७० टक्के ज्वलनशील घटक वायुरूपाने बाहेर पाडतो. जे की हा वायू बाहेर पडला की राहिलेला जो जैवभाराचा घटक भट्टीत शिल्लक राहतो तो त्यास कोळसा असे म्हणतात. पुण्यातील अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलजी इन्स्टिट्यूट या संस्थेने उसाच्या पाचटापासून कांडीकोळसा तयार होईल असे यंत्र विकसित केले आहे. हा तयार झालेला जो कांडी कोळसा आहे तो कार्बनयुक्त कोळसा जळत राहिला की धूर तसेच बुडाला काजळी देखील लागत नाही.
कांडीकोळसा तयार करण्याची पद्धत :-
१. कांडी कोळसा तयार करण्यासाठी एक भट्टी तयात केली आहे जी नवीन प्रकारात मोडते. ही भट्टी आकाराने लहान आहे तसेच सुटसुटीत व सहजपणे आपण वाहतूक करू शकतो. जे की ही भट्टी २०० लिटर च्या पत्र्याच्या पिंपपासून तयार केलेली आहे. जो तयार झालेला कोळसा आहे तो साठविण्यासाठी अजून एक पत्र्याचा पिंप असतो. जे की या भट्टीची उंची १४० सेमी आहे तर या भट्टीच्या खालच्या बाजूला १३ छिद्र असतात तर कडेला १२ छिद्र असतात. या भट्टीमध्ये १५ ते २० मिनिटं मध्ये कोळसा तयार होतो मात्र योग्यवेळी भट्टीचे झाकण काढणे गरजेचे आहे.
२. जो की तयार झालेला कोळसा आहे तो दुसऱ्या लोखंडी बॅरलमध्ये भरून घट्टपणे झाकण लावणे गरजेचे आहे. जर कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असेल तर ५ ते ६ भट्ट्या लावून कोळसा तयार होतो. तयार झालेला कोळसा जमिनीवर पसरायचा आणि त्यावरून रूळ किंवा मोठा सिमेंटचा पाईप फिरवला की कोळशाचा बारीक भुगा होतो. जे की यामध्ये शेण कींवा खळ मिक्स करून सुमारे ४ सेमी व्यासाचे इंधन गोळा करता येते व एक्स्ट्रुडर च्या मदतीने कांडी कोळसा किंवा इंधन विटा तयार करता येतात.
हेही वाचा:-ही लक्षणे आढळून आल्यास समजा तुमच्या फुप्फुसात पाणी भरलंय , वाचा उपाय
कोळशाच्या शेगडीत कांडीकोळशाचा वापर :-
कोळशाच्या शेगडीमध्ये हे इंधन चांगल्या पद्धतीने जळत असते. जे की लोहार कामाला सुद्धा हा कोळसा वापरला जातो. या प्रक्रियसाठी उसाची पाचट हे योग्य मानले जाते. जे की उसाच्या शेतीमध्ये जवळपास प्रति हेक्टर १० टन पाचट तयार होते मात्र या पाचट चा शेतकऱ्यांना काही उपयोग नसतो त्यामुळे शेतकरी ती पाचट जाळून टाकतात. या नवीन प्रकारच्या भट्टीचा वापर हा या उसाच्या पाचट पासून रोज १०० किलो कोळसा निर्माण केला जातो जे की हा कोळसा प्रति किलो ७ ते १० रुपये भावाने विकला जातो.
Share your comments