सध्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना आता राजपत्रित अधिकाऱ्यांनी एक दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये (Chief Minister Relief Fund) देण्याचे जाहीर केले आहे.
एप्रिल महिन्यातील एक दिवसाचा पगार हा मुख्यमंत्री निधीत जमा केला जाणार असल्याची माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाचे (Maharashtra State Gazetted Officers Federation ) अध्यक्ष विनोद देसाई यांनी सांगितले. यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील विविध खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय संघटनांची शिखर संघटना आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध खात्यांमध्ये जवळपास दीड लाख राजपत्रित अधिकारी आहे. याबाबत त्यांची एक बैठक झाली आहे.
फळांच्या राजाला वाचवा, बदलत्या हवामानात हापूस आंब्याचे ५० ते ८५ टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले..
सध्या राज्यात दोन वेळा झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या या प्रयत्नांना महासंघाशी संलग्न असलेले सर्व अधिकारीदेखील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करत असल्याचे राजपत्रित अधिकारी महासंघाने म्हटले आहे.
शेतकऱ्यांनो तुमचे महत्त्वाचे हक्क तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या होईल फायदा
पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकं बाधित झाली आहेत. द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या बागांना मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडं गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला या पिकांचेही नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी अडचणीत गेला आहे.
दिवसा वीज देण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
शेतकऱ्यांनो तुमचे महत्त्वाचे हक्क तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या होईल फायदा
देशात साखरेचं उत्पादनात घटलं, दर वाढण्याची शक्यता..
Share your comments