MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

घरात लग्नाची घाई असताना शेतकऱ्यांच्या गोठ्यात अग्नितांडव, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

मुलीच्या लग्नकार्यात व्यस्त असलेल्या शेतकऱ्याच्या समोर नवीनच समस्या आली आहे. बीडमध्ये खंडाळा येथील अशोक बांगर यांनी जनावरांसाठी साठवलेल्या (Fodder Crop) कडबा गंजीला आणि गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.

fire  broke out in a farmers barn

fire broke out in a farmers barn

मुलीच्या लग्नकार्यात व्यस्त असलेल्या शेतकऱ्याच्या समोर नवीनच समस्या आली आहे. बीडमध्ये खंडाळा येथील अशोक बांगर यांनी जनावरांसाठी साठवलेल्या (Fodder Crop) कडबा गंजीला आणि गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. एकीकडे लग्नसमारंभासारखा सोहळा अन् शेतामध्ये हे विघ्न घडल्याने सध्या चर्चा सुरु आहे. गोठ्याच्या परिसरात लावलेल्या गंजी तर जळाल्याच शिवाय इतर साहित्याचे देखील नुकासान झाले आहे.

अशोक बांगर व त्यांचे बंधू लक्ष्मण बांगर यांच्या कडब्याच्य़ा गंजी तर आगीच्या भक्ष्यस्थानी ठरल्या आहेत. अचानक गोठ्याला लागलेल्या आगीत सर्वकाही मातीमोल झाले आहे. या दोन्ही भावांनी जनावरांसाठी गोठ्यासमोरच कडब्याच्या गंजी उभ्या केल्या होत्या तर गोठ्यातील 10 क्विंटल लसून, ऊस, जनावरांचा गोठा असे 4 लाखाचे नुकसान झाले आहे. भरपाईची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

अशोक बांगर व लक्ष्मण बांगर या दोघा भावांनी कडब्याची जुळवाजुळव करुन गंजी रुपाने साठवणूक केली होती. वाऱ्यामुळे ही या आगीने अवघ्या वेळेत रौद्ररूप धारण केले होते. नागरिकांना आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, ते शक्य झाले नाही. यामळे लग्नात विघ्न तर आलेच पण चार लाखाचे नुकसान हे वेगळेच. त्यामुळे आता काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

रब्बी हंगामात अथक परिश्रम घेऊन अशोक बांगर व लक्ष्मण बांगर यांनी उत्पादन घेतले होते. शिवाय शेतीमालाची साठवणूक ही शेतामधील गोठ्यातच केली होती. यामुळे या शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम असताना इतर समस्यांनी शेतकरी त्रस्त आहे. यामुळे आता पाऊसकाळ तरी कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
आंब्याची कोय फेकून देताय? थांबा जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे..
Kharif Season: अजित पवारांनी मिटवला खरिपाचा प्रश्न, पीक पध्दतीबाबत दिला मोलाचा सल्ला...
'सर्वांना घरे' ही राज्य सरकारची योजना माहिती आहे का? वाचा सविस्तर, सर्वांना मिळणार हक्काचे घर

English Summary: A fire broke out in a farmer's barn while he was in a hurry to get married at home Published on: 15 May 2022, 03:52 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters