कोरोनामुळे पडलेले लॉकडावन व नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी अडचणीत आहे त्यामधील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील शेतकऱ्याचे तब्बल २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.महेंद्रसिंह शिंदे या शेतकऱ्याने १० एकर क्षेत्रावर पेरूची बाग लावली होती पण या अशा संकटांमुळे त्याने या बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावल्याने त्याच्यावर कर्ज वाढत चालले होते त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला.
पेरुचे उत्पन्न सुरू व्हायला आणि कोरोनामुळे लॉकडॉन लागायला:-
महेंद्रसिंग बाळासाहेब शिंदे यांनी मागच्या दोन वर्षात मिरज बेडग रोडजवळ १० एकर क्षेत्रावर लखनौ सरदार या जातीची पेरूची सुमारे साडे सात हजार रोपे आणली होती त्याची लागवड करण्यास त्यांना सर्व खर्च २५ लाख रुपये आला. या पेरूच्या बागेपासून वर्षाला त्यांना १५ लाख रुपये उत्पन्न भेटेल अशी आशा बाळगली होती पण कोरोणामुळे देशभरात लॉकडावन पडल्याने त्यांचे उत्पन्न घटले गेले.
हेही वाचा:आता आला डिजिटल प्लॅटफॉर्म किसान सारथी, वाढेल शेतकऱ्यांचे उत्पन्न
शासनाकडून पंचनामे झाले, मात्र अद्याप मदत नाहीच:-
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडावन लागल्याने महेंद्रसिंग शिंदे यांनी ने पेरू लावले होते ते पेरू व्यापाऱ्यांनी विकत घेतले नाहीत त्यामुळे लागलेले पेरू सडायला सुरू झाले.त्यांना अशा होती की या वर्षी तरी बागेला गेलेला खर्च निघून येईल पण वादळी वाऱ्यामुळे व अनियमित पावसामुळे लागलेली फळे सुद्धा गळून गेली त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने अनेक पंचनामे तयार केले पण अजून पर्यंत त्यांनी कसलीच मदत केली नाही असे शिंदे यांनी सांगितले आणि त्यांना संताप झाल्याने दहा एकराच्या बागेवर कुऱ्हाड चालवली.
आता तरी शासनाने लक्ष द्यावे, शेतकऱ्याची विनवणी :-
सरकार नेहमी सांगते की आम्ही बागायतदार शेतकऱ्यांना मदत करण्यास उभे आहोत पण प्रत्यक्षात पहिला गेले तर त्यांच्याकडुन कोणतीही मदत मिळाली नाही, तसेच भारत देशाला आपण कृषी प्रधान देश म्हणून ओळखतो पण इथे कृषी व्यवसायाला कोणतीही मदत केली जात नाही.कोरोनामुळे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात आहे त्यामुळे अत्ता तरी सरकारने डोळे उघडावे व मदत करावी अशी विनंती महेंद्रसिंग शिंदे या शेतकऱ्याने सरकारला केली आहे.
Share your comments