
a farmer died in nashik
दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यासमवेतच राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने त्राहिमाम माजवायला सुरुवात केली आहे. या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले शिवाय तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील शेतकरी पुत्राचा वीज कोसळून मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील कवडे वस्ती परिसरात राहणारे कैलास सूर्यभान कवडे यांच्या बहिणीचा 16 मार्च रोजी विवाह संपन्न होणार असल्याने त्यांच्या घरात बहिणीच्या लग्नासाठी मोठी लगीनघाई आणि अशा आनंदाच्या वातावरणातच दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी नामक संकटामुळे कवडे कुटुंबावर एक मोठी शोककळा पसरली आहे.
त्याचं झालं असं, बुधवारी सकाळी ठीक सहा वाजता कैलास सूर्यभान कवडे आपल्या जनावरांचा चारा झाकण्यासाठी तसेच कांदा झाकण्यासाठी बाहेर गेले असता त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अवकाळी पावसामुळे कवडे कुटुंबावर एक मोठे दुःखाचे सावट कायम झाले आहे, सूर्यभान यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात त्यांचे वडील, आई, एक भाऊ, एक बहीण, त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
अवघ्या सहा दिवसांवर बहिणींचे लग्न असतानाच भावाचे असे अपघाती निधन झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, कवडे कुटुंबासाठी प्रार्थना देखील केली जातं आहे.
Share your comments