सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. असे असताना आता कोलकाता येथील आयएमडीच्या प्रादेशिक हवामान केंद्राने बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती दिली आहे. सोमवारी दक्षिण अंदमान समुद्र आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सौम्य चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. या वादळाची तीव्रता किती असणार हे आता लवकरच समजेल. आज सकाळपर्यंत हे वादळ उत्तर अंदमान समुद्र परिसरात होते, अशी माहितीही कोलकता येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिली.
पुढील दोन दिवसांमध्ये दक्षिण-पूर्व बंगाल आणि लगतच्या भागत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यानंतर २२ ऑक्टोबरपर्यंत याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. यामुळे आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे.
50 हजार प्रोत्साहनपर लाभ योजनेचा 20 ऑक्टोबरपासून शुभारंभ, सहकारमंत्र्यांची माहिती..
दरम्यान, हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
याबाबत कोलकाता येथील IMD च्या RWFC ने जारी केलेल्या निवेदनात माहिती दिली आहे. हे वादळ किती तीव्र असेल याबाबत अजून कोणतीही माहिती अजून दिली गेली नाही. ‘सीतरंग’ असे या वादळाचे नाव ठेवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या;
म्हशीची ही जात 700 ते 1200 लिटर दूध देते, दूध उत्पादकांना मिळणार बंपर कमाई
बंगालच्या उपसागरात 'सीतरंग' चक्रीवादळाची शक्यता, यामुळेच महाराष्ट्रात तुफान पाऊस..
सेंद्रिय शेतीसाठी रासायनिक कीटकनाशकांची चिंता सोडा, कडुलिंबाचा हा पर्याय घरीच बनवा
Share your comments