1. बातम्या

राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांच्या अभ्यासासाठी लोकप्रतिनिधींची समिती गठीत

या शासन निर्णयानुसार राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी मंत्री सुभाष देशमुख, विधानसभा सदस्य रईस शेख, अनिल बाबर यांच्यासह विधानपरिषद सदस्य प्रविण दटके हे सदस्य आहेत. तर महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

agriculture news

agriculture news

नाशिक : राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती गठीत करण्यात आली आहे. या बाबतचा सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी मंत्री सुभाष देशमुख, विधानसभा सदस्य रईस शेख, अनिल बाबर यांच्यासह विधानपरिषद सदस्य प्रविण दटके हे सदस्य आहेत. तर महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. तसेच समिती राज्यातील ज्या विभागात पाहणी दौरा करेल त्या विभागातील संबंधित प्रादेशिक उपआयुक्त (वस्त्रोद्योग) तेथील समन्वयक म्हणून काम पाहतील, असे ही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

अशी आहे समितीची कार्यकक्षा…
राज्यातील यंत्रमागबहुल भागातील संघटना यांनी दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने त्यांच्या समस्यांचा अभ्यास करणे.
राज्यातील यंत्रमागबहुल भागातील समस्यांबाबत यंत्रमाग धारकांच्या विविध संघटना/फेडरेशन यांच्याशी चर्चा करणे.
राज्यातील यंत्रमागबहुल भागातील समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना शासनास सादर करणे.
वस्त्रोद्योग प्रकल्पांना वीज सवलत योजनेंतर्गत यंत्रमाग धारकांना ऑनलाईन नोंदणी करणेसाठी येत असलेल्या अडचणींबाबत उपाययोजना सुचविणे.
यंत्रमाग घटकासाठी अल्पकालीन उपाययोजना सुचविणे.
राज्य शासनाच्या यंत्रमागासाठीच्या प्रचलित योजनांमध्ये काही बदल सुचवायचा असल्यास त्यानुसार बदल प्रस्तावित करणे.

English Summary: A committee of people representatives is formed to study the problems of loom owners in the state Published on: 28 December 2023, 12:07 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters