दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे नागरिकांची तलकी च उठलेली आहे मात्र दुसऱ्या बाजूला साखर उद्योगात उन्हाळ्यामुळे शीतपेयची अधिक मागणी वाढलेली आहे. जे की या वाढत्या मागणीचा परिणाम दरावर दिसून येत आहे. साखरेचे उत्पादन तसेच वाढते ऊन यामुळे सरकारने एप्रिल महिन्यात २२ लाख टनाचा कोटा दिलेला आहे. मार्च महिन्यात हाच कोटा २१.५ लाख टनाचा होता. यंदाच्या वर्षी साखरेचे उत्पादन वाढतच विविध माध्यमातून साखरेची मागणी देखील वाढलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता सर्व नियम शिथिल करून आता बाजारपेठ खुल्या करण्यात आलेल्या आहेत. जे की याचा परिणाम हा साखरेच्या मागणीवर होत आहे.
शीतपेय उद्योगामध्ये मोठी उलाढाल :-
दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे शितपेयासोबतच विविध उद्योगातून सुद्धा साखरेची मागणी वाढतच चालली आहे. या सर्व गोष्टींचा अंदाज घेत केंद्र सरकारने या महिन्यात आधीच वाढीव कोटा ठेवलेला आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच सर्व नियम शिथिल करून बाजारपेठ खुल्या करण्यात आलेल्या आहेत. तर सार्वजनिक कार्यक्रमात पहिली जशी नियमावली होती ती नियमावली शिथिल करताच कार्यक्रम मोठ्या संख्येने वाढू लागले असल्याने नागरिकांची संख्या सुद्धा वाढल्याने उद्योगधंदेना उभारणी आलेली आहे. जे की या सर्व गोष्टींचा थेट परिणाम साखरेच्या मागणीवर झालेला आहे. साखरेचे वाढीव उत्पादन तसेच योग्य दर पाहता समाधान व्यक्त केले जात आहे.
साखरेला 3 हजार 200 ते 3 हजार 300 रुपये प्रति क्विंटलचा दर :-
मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने शीतपेय बंद होती. त्यामुळे मागणीत घट झाली होती मात्र आता सर्वकाही व्यवस्थितरित्या चालू झाले असल्याने मागणीत पुन्हा वाढ झालेली आहे. सध्या देशात साखरेला ३ हजार २०० ते ३ हजार ३०० रुपये असा भाव सुरू आहे. एप्रिल महिन्यात कडक ऊन राहिले असल्यामुळे आईस्क्रीम व शीतपेय तयार करण्यासाठी साखरेच्या मागणीत वाढ होणार असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील काही दिवसांपासून व्यापाऱ्यांनी साखर खरेदीवर भर दिलेला आहे.
तिसऱ्या लाटेचा धसका मात्र, सर्व निर्बंध शिथील :-
मागील दोन वर्षात उन्हाळयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असायचा. जे की यंदाही उन्हाळयात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा चालू होती त्यामुळे व्यापारी शांत राहिले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी पाहता आता सर्व बाजारपेठा, हॉटेल्स, लहान-मोठे व्यवसाय सुरू झाले असल्याने साखरेच्या मागणीत वाढ झालेली आहे. तर आता सर्व नियम शिथिल केले असल्यामुळे फक्त साखरेवरच नाही तर अन्य घटकांवर सुद्धा परिणाम होत आहे.
Share your comments