बाजारात सध्या बटाटा, कांदा, कारली, हिरवी मिरची, पावटा तसेच ढोबळी मिरची या फळभाज्यांच्या दरामध्ये घट झालेली आहे मात्र मटार च्या दरामध्ये वाढ झालेली असून फळभाज्यांचे दर आहे तसेच स्थित राहिल्याची माहिती बाजारातील व्यापारी वर्गाने दिलेली आहे.पुणे जिल्ह्यातील गुलटेकडी येथील श्री. छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात २९ ऑगस्ट म्हणजेच कालच्या रविवारी आपल्या राज्यातून तसेच परराज्यातून सर्व मिळून ८० ते ९० ट्रक भरून फळभाज्यांची आवक झालेली होती. कर्नाटक, आंधरप्रदेश व गुजरात मधून जवळपास १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची तसेच आंधरप्रदेश आणि तमिळनाडू मधून ४ ते ५ टेम्पो शेवगा.
भाज्यांची आवक बाहेरच्या राज्यातून झालेली आहे:
मध्यप्रदेश मधून सात ते आठ टेम्पो गाजर तर गुजरात आणि मध्यप्रदेश मधून १० ते १२ ट्रक लसूण. कर्नाटक आणि गुजरात मधून ४ ते ५ टेम्पो कोबी तर आग्रा, इंदूर तसेच गुजरात आणि तेथील स्थानिक भागातून ७० ते ७५ ट्रक बटाटा अशा प्रकारे भाज्यांची आवक बाहेरच्या राज्यातून झालेली आहे. अशी माहिती श्री. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड चे प्रमुख व्यापारी तसेच अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिलेली आहे.पुणे विभागातून ढोबळी मिरची चे १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ६ ते ७ हजार पेटी, फ्लॉवर चे १० ते १२ टेम्पो, सातारी आले ११०० ते १२०० गोणी, कोबी चे ५ ते ६ टेम्पो, तांबडा भोपळा ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, भुईमूग शेंग एक हजार गोणी तसेच पुरंदर, वाई आणि पारनेर भागातून ४०० ते ५०० गोणी मटार, कांदा ६० ते ७० ट्रक आणि पावटा चे ४ ते ५ टेम्पो अशा प्रकारे पुणे विभागातून आवक झाली.
हेही वाचा:रक्ताचे पाणी करून जगवलेल्या पपईच्या बागेची एका रात्रीत छाटणी
कोथिंबीर, मेथी, चाकवत महाग:-
अंबाडी, कोथिंबीर, चाकवत तसेच मेथी या पलेभाज्यांच्या दरात वाढ झालेली आहे मात्र कांदापात, करडई, पुदिना, राजगिरा, शेपू आणि चवळईच्या दारात घट झालेली आहे जे की पालक भाजीचे दर आहे तसेच स्थिर आहेत.कालच्या रविवारी श्री. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड च्या तरकारी विभागामध्ये कोथिंबीर च्या दीड लाख जोड्या तसेच मेथीच्या भाजीच्या ६० हजार जोड्यांची आवक झालेली आहे तर किरकोळ बाजारामध्ये मेथी तसेच कोथिंबीर च्या एका जोडीची किमंत १० ते २० रुपये आहे.
घाऊक बाजारात फळांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे जे की सीताफळ व डाळिंब या फळांच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. पेरू, चिकू, सफरचंद, खरबूज, मोसंबी, अननस तसेच संत्री या फळांचे बाजारात दर स्थिर आहेत अशी माहिती फळ बाजारातील व्यापारी वर्गाने दिलेली आहे.फळांच्या बाजारात केरळ मधून कलिंगड २ ते ३ टेम्पो, मोसंबी ७० ते ८० टन, ४ ट्रक अननस, डाळिंब ३० ते ४० टन, सफरचंद ३ ते ४ हजार पेटी, संत्री १० ते १२ टन, चिक्कू दोन हजार खोकी, पेरू ८०० क्रेट्स आणि लिंबाच्या दीड ते दोन हजार गोणी अशा प्रकारे आवक झालेली आहे.
Share your comments