नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याची विनंती केली आहे.
राज्यसभेत सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर झालेल्या चर्चेदरम्यान भाजप खासदार सुशील मोदी म्हणाले, "2000 ची नोट, म्हणजे काळा पैसा... 2000 ची नोट, म्हणजे साठेबाजी... काळा पैसा थांबवायचा असेल, तर 2000 रुपयांची नोट हवी तर बंद करा..."
भाजप खासदार सुशील मोदी म्हणाले, "यापुढे 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे कोणतेही औचित्य नाही... मी भारत सरकारला विनंती करतो की 2000 रुपयांची नोट टप्प्याटप्प्याने चलनातून बाद करावी..."
EPFO: सरकारने PF खातेधारकांसाठी केली मोठी घोषणा
अमेरिका, चीन, जपान अशा जगातील विकसित देशांमध्ये कोठेही १०० च्या पुढील चनल नाही. मग भारतात दोन हजार रुपयांच्या नोटेची गरज का आहे?” असा प्रश्न सुशील मोदींनी विचारला.
भारतात एक हजार रुपयांची नोट बंद करण्यात आली आहे, ५०० रुपयांचीही नोट आहे. त्यामुळे आता दोन हजार रुपयांच्या नोटची गरज नाही,” असं मत सुशील मोदींनी व्यक्त केलं.
7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, खात्यात येणार 2.18 लाख रुपये!
Share your comments