आपल्या महाराष्ट्रात एक गाव आहे जिथं शेतीला बांधच नाहीत, असे म्हटले तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. पण हे खरं असून आपल्या महाराष्ट्रात एक गाव असं आहे. यामुळे या गावाची चांगलीच चर्चा सुरु आहे. आपल्याकडे घराघरात भावकीत बांधावरून अनेकदा डोकी फोडली जातात. असे असताना मात्र या गावात हे कस शक्य आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
बांधावरून (dams) या गावात आजपर्यंत कधीही भांडण झाले नाही. या गावात शेताची हद्द निश्चित करण्यासाठी दगड लावले जातात किंवा झाडे लावले जातात. हे गाव सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात आहे. मंगळवेढा येथील शेतीला बांध न करण्याची शतकानुशतके जुनी परंपरा आहे. यामुळे हे गाव सर्वांच्या नजरेत पडले आहे.
तसेच याठिकाणी कुणाच्याही शेतात विहीर नाही. संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ज्वारी आणि हरभरा ही प्रमुख पिके म्हणून या भागात घेतली जातात. साधारणपणे वर्षातून एकच पीक या भागात घेतले जाते जे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. यामुळे इतर वेळेस जमीन पूर्णपणे पडीक असते.
याठिकाणी बांधावरून काही वाद असले तरी ते आपसात सामोपचाराने तातडीने सोडवले जातात. मंगळवेढा-साेलापूर राेडलगत शेताच्या चारही दिशांना 12 किलाेमीटरपर्यंत शेतात बांधच (dams) नाहीत. हे क्षेत्र तब्बल 38 हजार हेक्टर आहे. म्हणजेच 95 हजार एकर आहे. ही जमीन सुपीक आणि सपाट आहे. 40 फुटांपर्यंत काळी माती असल्याने जमिनीचा पाेत बदलत नाही.
मुख्यमंत्र्यांची शेंद्रीय शेती! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले शेतात..
दरम्यान, याठिकाणी पावसामुळे या जमिनीत बांध टिकत नाहीत. शेतकरी शीव किंवा हद्द ओळखू यावी म्हणून फक्त एक फुटाचा दगड उभा करतात किंवा एखादे झाड लावतात. दरम्यान, इंचभर (dams) जागेवरून देखील हे वाद होतानाचे चित्र ग्रामीण भागात आहे. शेजारी तर सोडा पण सख्ख्या भावा भावात हे बांधावरून वाद झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात आहेत.
महत्वाच्या बातम्या;
माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत राज्य सरकार मुलींना देणार 50 हजार रुपये
बीन्सच्या शेतीतून मोठी कमाई, अवघ्या 6 महिन्यांत 13 लाखांपर्यंतचा नफा..
कृषी क्षेत्रातील पायाभूत कामांसाठी पतपुरवठा सुधारा, रिझर्व्ह बॅंकेने इतर बॅंकांचे टोचले कान...
Share your comments