1. बातम्या

Kharif Sowing : राज्यात ९३ टक्के खरीपाची पेरणी; पाहा कोणत्या पिकांची किती पेरणी

यंदा राज्यात तुरीचा पेरा १०.७१ लाख हेक्टरवर झाला आहे तर १०.७१ लाख हेक्टर इतकाच भात पुर्नलागवड देखील झालीय. तसंच सोयाबीनचा ४८.३८ लाख हेक्टर पेरा झाला असून ४१.४८ इतका भाताचा पेरा झाला आहे.

Kharif Sowing Update

Kharif Sowing Update

पुणे

राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. मात्र अद्यापही काही भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. तरी राज्यात खरीप पीक पेरा (kharif swoing update) ९३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाने दिली आहे. 

कृषी आयुक्तालयाच्या माहितीनुसार, राज्यातील खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. राज्यात बहुतेक भागात पेरणीची कामे उरकत आली आहेत. काही ठिकाणी कापूस, सोयाबीन, तूर तसेच भाताच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत.

राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान पूर्ण १०० टक्के पाऊस झाला आहे. या दरम्यान सरासरी ६०३ मिलीमीटर इतका पाऊस होता. तर यंदा प्रत्यक्षात ६०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके आणि बियाणे याबाबत समस्या निर्माण झाल्यास तात्काळ तक्रार करावी, असं आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. 

English Summary: 93 percent kharif sowing in the state See how many crops are sown Published on: 09 August 2023, 11:27 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters