1. बातम्या

हिंदी महासागरातून अदृश्य झालेत ९० ट्क्के डॉल्फिन, जाणून घ्या कारण

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:  महासागरात आढळणारा बुद्धीमान मासा म्हणजे डॉल्फिन. आपल्या कर्तबगारीने डॉल्फिन नेहमीच लोकांना आकर्षित करत असतो. परंतु येत्या काही दिवसात या माशांची प्रजाती नष्ट होईल की काय असा भीती पर्यावरण प्रेमींमध्ये निर्माण झाली आहे.  अंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या एका समूहाने डॉल्फिनविषयी एक धक्कादायक बाब समोर आणली आहे. काही दिवसात डॉल्फिन हा मासा दृष्टीआड होण्याची शक्यता शस्त्राज्ञांनी वर्तवली आहे. कारण हिंदी महासागरातून डॉल्फिनची संख्या ९० टक्क्यांनी कमी झाल्याचे वृत्त डाऊन टू अर्थ या वृत्त संस्थेने दिली आहे. यामुळे येत्या काही दिवसात हिंदी महासागरात आपल्याला डॉल्फिनचे दर्शन होणार नाही. डॉल्फिनची संख्या कमी होत असून त्यांची संख्या का कमी होत आहेत, याची कारणे संशोधकांनी दिली आहेत.

गिलनेटच्या वाढत्या वापरामुळे डॉल्फिनची संख्या कमी होत आहे. या गिलनेटचा वापर ट्यूना हे माशांना पकडण्यासाठी वापरले जाते. यासंबंधीचा अभ्यास जेम्स कूक विद्यापीठाने केला आहे. गिलनेट हे जाळीची एक भिंत असते. ही जाळी १०० मीटर पासून ते ३ किमी अंतरापर्यंत लांब असते. या जाळीला ५ ते २० मीटर खोल पाण्यात लावण्यात येते. दरम्यान समुद्रात या जाळीचा वापर प्रतिबंधित आहे. परंतु मनाई असूनही नियामांना धाब्यावर बसून या जाळींचा वापर केला जातो. या जाळीला करण्यात आलेली छिद्रे ही अशाप्रकारच्या आहेत ज्यात फक्त ट्यूना या माशांचे डोकेचं  अडकेल. या जाळीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न ट्यूना मासा करत असतो. पण बाहेर निघण्याऐवजी तो मासा अधिक अडकत जातो. छोट्या आकारांची मासे या छिद्रातून निसटून जातात. पण शार्क, कासव, देव मासा आणि  डॉल्फिनसारखे मासे यात अडकून पडतात. संशोधनकर्त्यांनी याप्रकरणाचा अभ्यास १९८१ ते २०१६ दरम्यान भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलेया आणि श्रीलंकेत केला आहे.

या अभ्यासातील १० वेगवेगळ्या अभियानातून मिळालेल्या आकड्याच्या साहाय्याने हे विश्लेषण करण्यात आले आहे.  यात त्यांनी ट्यूनासह पकडण्यात आलेल्या व्हेल, डॉल्फिन आणि पर्पोइजची संख्या आणि त्यांच्या प्रमाणाचे अनुमान लावण्यात आले. याप्रकारे करण्यात आलेल्या शिकारीमध्ये डॉल्फिन अधिक आहेत. संशोधनानुसार, २००४ ते २००६ च्या दरम्यान प्रत्येक वर्षी ट्य़ूनासह साधारण १ लाख अन्य जीव या जाळ्यात अडकत असतात. यात सर्वोधिक संख्या ही डॉल्फिनची असते. दरम्यान हा आकडा सध्या कमी झाला आहे. १९५० ते २०१८ च्या दरम्यान हिंदी महासागरात लावण्यात आलेल्या गिलनेटमध्ये साधारण ४१ लाख जीव मारले गेले आहेत. हा आकडा यापेक्षा अधिकही असू शकतो. यासंबधीचा रिकॉर्ड उपलब्ध नसल्याने याची पुर्ण कल्पना नाही.

कारण बऱ्याचवेळा जाळ्या समुद्रात हरवून जात असतात. त्यात मासे अडकून पडतात किंवा त्यांचा मृत्यू नंतर होत असतो. त्यांचा या संख्येत समावेश केला जात नाही. या अभ्यासाशी संबंधित असलेले संशोधन कर्ते डॉ. पुतू मुस्तिका सांगतात, 'अनेक वर्षांपासून हिंदी महासागरात गिलनेटच्या मदतीने ट्यूना मासा पकडला जातो. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात इतर समुद्री जीव मारले जातात. पण त्याकडे कधी लक्ष दिले जात नाही'. संशोधनानुसार आज पण प्रति १ हजार टन ट्यूनासह १७५ टन अन्य जीव पकडले जातात. दरम्यान १९७० मध्ये हा आकडा प्रति हजार ६०० होता. आजच्या घडीला इराण, इंडोनिशिया, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ओमान, यमेन, यूएई, आणि तंजानियात सर्वात जास्त जीव ट्यूनासह मारले जातात. इराण आणि इंडोनेशियात याची कोणतीच चौकशी केली जात नाही. शास्त्रज्ञांच्या मते, जर डॉल्फिनला वाचवायचे असेल तर त्यांच्या संख्येत सुधारणा झाली पाहिजे. यासह त्यांच्यावर नजर ठेवली गेली पाहिजे आणि मासे पकडण्याच्या पद्धतीत बदल करावा लागेल.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters