1. बातम्या

नाशिक जिल्हा बँकेला ८७० कोटीचा निधी मंजूर; लवकरच मिळणार पीक कर्ज

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एका आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्हा बँकेला ८७० कोटी रुपयांची निधी मंजूर झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लवकरच पीक कर्ज मिळेल.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एका आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्हा बँकेला ८७० कोटी रुपयांची निधी मंजूर झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लवकरच पीक कर्ज मिळेल. 'महात्मा फुले कर्जमुक्ती' योजनेंतर्गत नाशिक जिल्हा बँकेला ८७० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असुन, हा निधी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. बँकेतून कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीला समोरे जावे लागले. परंतु आता जिल्हा बँकेला निधी झाला असून शेतकऱ्यांना लवकरच कर्ज मिळू लागतील.

दरम्यान नाशिक जिल्हा परिषदेत कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कृषी व कोरोना साथरोग व इतर विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते. ही बैठक सोमवारी पार पडली यावेळी मंत्री भुसे म्हणाले की, खरीप पीक हंगामासाठी सध्या पोषक वातावरण असुन शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व शेती अवाजारे खरेदीसाठी वित्तीय उपलब्धता आवश्यक असते. म्हणून शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आठवडाभरात निधी उपलब्ध करून, शेतकऱ्यांच्या पीक विमा कर्ज व इतर कर्ज खात्यावर परस्पर जमा न करता त्यांना थेट त्याचा लाभ देण्यात यावा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पीककर्जाचा पुरवठा वेळेत झाल्यास जिल्ह्यातील बँकांची कामगिरी व विश्वासार्हता यातून निदर्शनास येईल, यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाल्यास संबंधित बँकांवर गुन्हे दाखल करुन कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.  यावेळी श्री. मंत्री भुसे यांनी पशुसंवर्धन अधिकारी यांना सध्या मेंढीवर आढळणाऱ्या लंगड्या आजाराची माहिती घेवून या रोगाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी त्वरीत उपाययोजना राबविण्यास पशुसंवर्धन विभागास सांगितले आहे.

English Summary: 870 crore fund grant to nashik district bank , farmer will get crop loan immediately – agriculture minister Published on: 15 July 2020, 07:12 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters