यावर्षी गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये जवळजवळ 191 साखर कारखाने सुरू आहेत. या सुरू कारखान्यांपैकी जवळजवळ त्र्याऐंशी कारखान्यांनी एफ आर पी ची शंभर टक्के रक्कम वेळेवर दिली आहे.
त्यामुळे अशा कारखान्याचे नाव साखर आयुक्तालयाकडून ग्रीन लिस्टमध्ये नोंदवले आहे. या 83 साखर कारखान्यांमध्ये 47 साखर कारखाने सहकारी असून उर्वरित 36 साखर कारखाने खाजगी आहेत. यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कारखान्यांना बाजी मारली आहे तर पुणे जिल्हा नगर पेक्षाही पीछाडीवर आहे. राज्यातील एकूण कारखान्यांपैकी विचार केला तर 96 सहकारी साखर कारखाने आहेत व 95 खाजगी आहेत.आता हंगाम निम्मा संपला तरीदेखील त्यापैकी 28 कारखान्यांनी 60 टक्क्यांपेक्षा कमी एफ आर पी दिली आहे त्यामुळे असे कारखाने रेड लिस्ट मध्ये आहेत.
यामध्ये सहकारी आणि खासगी असे मिळून 14 कारखाने आहेत कारखान्याची आर्थिक सक्षमता शेतकऱ्यांना करावी यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील कारखान्यांचे चार गटात विभागणी केली आहे. या चार गटांपैकी जे कारखाने 100% एफआरपी देतीलत्यांना हिरवा यादीत, 80 ते 99.99 टक्के एफआरपी देणाऱ्यांना पिवळ्या तर 60 ते 79.99 टक्के एफआरपी देणाऱ्यांना नारंगी तर शून्य ते 59.99 टक्के एफआरपी देणार्यांची नावे रेड लिस्टमध्ये दर्शविले आहेत.
यानुसार 15 जानेवारी पर्यंतचा आकडेवारी पाहिली तर सदुसष्ट कारखाने हिरव्या यादीत, 31 कारखाने पिवळा यादी तर चौतीस नारंगी यादीत तर 55 कारखाने लाल रंगाच्या गटात होते. आठ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार हिरव्या यादीमध्ये त्र्याऐंशी, पिवळ्या यादीत 47, नारंगी मध्ये 33 तर लाल यादीमध्ये 28 कारखान्यांचा समावेश आहे.
Share your comments