1. बातम्या

जेवढे गेले त्यातले 80 टक्के परत येतील : राष्ट्रवादीचे वरिष्ठ सूत्र

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींचा अक्षरश: चिखल झालेला बघायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षात आता तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार हे देखील उपुमख्यमंत्री असणार आहेत.

NCP source

NCP source

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षात आता तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार हे देखील उपुमख्यमंत्री असणार आहेत.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भुजबळ यांच्यासह हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे हे आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेत नाही. पण या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नाहीय. शरद पवार यांची या घडामोडींवरील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट! ९ मंत्र्यांचा शपथविधी होणार तर ३० आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे शरद पवार यांची प्रतिक्रिया सांगितली आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.

माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही”, असं संजय राऊत यांनी ट्विटरवर सांगितलं आहे.

'मी अजित पवार दृढ कथन करतो की....' अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

English Summary: 80 percent of what has gone will come back: Senior NCP source Published on: 02 July 2023, 03:22 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters