मुस्लिम धर्मीयांमध्ये बकरी ईदचे विशेष महत्त्व आहे. रमजान ईद प्रमाणेच मुस्लिम धर्मीयांमध्ये बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यादिवशी मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात. यामुळे मोठ्या प्रमाणात बकऱ्यांना महत्त्व आहे.
दिल्लीच्या जामा मशिदीजवळ उर्दू बाजारात बकरी ईदनिमित्त बकऱ्यांचा बाजार भरला आहे. खास बकरी ईदनिमित्त हा बाजार भरतो. यामुळे याला विशेष महत्त्व आहे.
या बाजारात हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यातीलही बकरे विक्रीसाठी आणले जातात. यावेळी एकापेक्षा एक प्रकारची बकरी याठिकाणी बघायला मिळतात.
कारखानदारांनो एफआरपी कधी देणार? पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे १८९ कोटींची एफआरपी थकित
यामध्ये उत्तरप्रदेशमधून विक्रीसाठी आणलेल्या एका बकऱ्याची खूप चर्चा रंगली आहे. हा बकरा उंच आणि तंदुरूस्त असून दिसायला इतर बकऱ्यांच्या तुलनेत रुबाबदार आहे. याला मालकाने १५ लाख रुपये इतकी किंमत सांगितली आहे.
दरम्यान, सलमान खान याला विक्री करण्यासाठी हा बकरा पाळल्याचा दावा मालकाने केला आहे. सहा महिन्यांचा असताना या बकऱ्याच्या गळ्याजवळील पोटाच्या भागावर काही उर्दू शब्द दिसू लागले.
दुग्धव्यवसायाला मिळते गती, हे यंत्र अनेकांची कामे मिनिटांत करते, जाणून घ्या...
त्यानंतर अनेक मुस्लिम धर्मगुरूंना हे शब्द दाखविण्यात आले. त्यावेळी बकऱ्याच्या पोटावर अरबीमध्ये 'अल्लाह' हे नाव असल्याचे समजले. यामुळे याची किंमत वाढली आहे.
यावर्षी पुणे जिल्ह्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता, कृषी विभागाचा नियंत्रणासाठी पुढाकार..
अंबादास दानवे थेट कृषी केंद्रात! योग्य दरात बियाणे, खतांची विक्रीचे करण्याचे निर्देश...
आता वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण
Share your comments