7 व्या वेतन आयोगाअंतर्गत, महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) महागाई भत्त्यात (DA) वाढ जाहीर केली आहे. डीएचा हप्ता लवकरच कर्मचाऱ्यांना (Maharashtra Government Employees) मिळणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 31 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.
हे प्रमाण लवकरच 34 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारनंतर अनेक राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. सध्या केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता देत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे की सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत हप्त्यांमधून महागाई भत्ता वाढविला जाईल.
असा दिला जाणार आहे DA
राज्य सरकार 5 हप्त्यांमध्ये डीए कर्मचाऱ्यांना देणार आहे. सरकारने आधीच दोन हप्त्यांमध्ये DA कर्मचाऱ्यांना दिला आहे. आता तिसऱ्या हप्त्याची वेळ आहे. सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा सुमारे 17 लाख महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
या कर्मचाऱ्यांना होणार फायदा
2019 मध्ये महाराष्ट्र सरकारी कर्मचारी तसेच जिल्हा परिषद आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाखाली आणण्यात आले. त्यानंतर सरकारने निर्णय घेतला की 2019-20 पासून कर्मचार्यांना पाच वर्षांसाठी पाच हप्त्यांमध्ये DA दिला जाईल.
इतके हफ्ते मिळालेत
राज्यातील कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दोन हप्ते मिळाले आहेत. जूनमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तिसरा हप्ता मिळणार आहे. यानंतर येत्या काही वर्षांत चौथा आणि पाचवा हप्ता दिला जाईल.
पगार 40 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे
सरकारच्या या निर्णयामुळे सातव्या वेतन आयोगांतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांमधील अ गटातील अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. पगारात एकाच वेळी सुमारे 30,000 ते 40,000 रुपयांची वाढ होईल. गट ब अधिकाऱ्यांना 20,000 ते 30,000 रुपये बोनस मिळेल. गट क अधिकाऱ्यांना 10,000 ते 15,000 रुपये मिळतील. तर, गट डी अधिकाऱ्यांना 8,000 ते 10,000 रुपये मिळतील. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए आता 31 झाला आहे.
Share your comments