1. बातम्या

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना आलेत अच्छे दिन...! 1 जुलै पासून इतका पगार होणार

7th pay commission: जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आता केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करणार असल्याचे समोर झाले आहे, निश्चितच केंद्र सरकारचा हा निर्णय सरकारी नोकरदारांसाठी जणू काही मोठ वरदान ठरणारा आहे. हाती आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली जाणार आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
7th pay commission

7th pay commission

7th pay commission: जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आता केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करणार असल्याचे समोर झाले आहे, निश्चितच केंद्र सरकारचा हा निर्णय सरकारी नोकरदारांसाठी जणू काही मोठ वरदान ठरणारा आहे. हाती आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली जाणार आहे

ज्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा भावना दिसत आहे. मित्रांनो आम्ही इथे सांगू इच्छितो की, प्रसारमाध्यमांनुसार 1 जुलैपासून आपल्या पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

असं सांगितलं जात आहे की, यावेळी डीए म्हणजेच महागाई भत्ता हा तब्बल 4 टक्क्यांनी वाढवला जाणार आहे. म्हणजेच आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 38 टक्के होणार आहे. यामुळे सहाजिकच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात विक्रमी वाढ होणार आहे.

सध्या कर्मचाऱ्यांना 34 टक्के डीएचा लाभ मिळत असून, तो आता 38 टक्के होणार आहे. सरकारने अद्याप अधिकृतपणे डीए वाढवण्याची घोषणा केलेली नसली तरी देखील काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

जनधन खातेधारकांची लागणार लॉटरी! दर महिन्याला पडणार खात्यावर 'इतके' पैसे जाणून घेऊया या विषयी

जाणून घ्या किती होणार पगारवाढ

मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढवून केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठं गिफ्ट देणार आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा केला जात आहे की, महागाई भत्ता हा 4 टक्क्यांनी वाढवला जाणार आहे. म्हणजेच महागाई भत्ता आता 38 टक्के केला जाणार असल्याचे सूत्राद्वारे सांगितले जात आहे. महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढल्यानंतर पगारात विक्रमी वाढही नोंदवली जाणार आहे. सुमारे 47 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना वाढीव डीएचा म्हणजेचं महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. एकंदरीत सव्वा कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोदी सरकार आनंदाची बातमी देणार आहे. 

लईचं झाक ऑफर! 14 हजारात TVS Apache आणा आपल्या घरी, Apache वर फिरण्याची करा इच्छा पुरी; कस ते जाणून घ्या

एका सरकारी अहवालानुसार, सरकारने डीए 4 टक्क्यांनी वाढवल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 34 चा 38 टक्के होईल. त्यामुळे मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे. ज्या कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 56,900 रुपये आहे, त्यांना 38% महागाई भत्ता वाढल्यावर  21,622 रुपये DA मिळेल आणि पगारात दर महिन्याला 2,276 रुपयांची वाढ होईल.

दरवर्षी पगारात 27,312 रुपयांची वाढ होईल म्हणजेच एकूण वार्षिक डीए 2,59,464 रुपये असेल. त्याचप्रमाणे 18000 पगार असलेल्या सरकारी नोकरदारांना 8640 रुपये प्रत्येक महिन्याला महागाई भत्त्याच्या स्वरूपात अधिक मिळतील म्हणजे अशा सरकारी नोकरदारांना 1,03,680 वार्षिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे.

लागली ना राव लॉटरी! बँकेत खात नसलं तरी एसबीआई देणार महिन्याकाठी 60 हजार, वाचा

डीए वर्षातून दोनदा वाढतो

त्याचवेळी, आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगु इच्छितो की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA हा वर्षातून दोनदा वाढवला जातो. पहिली वाढ जानेवारी ते जून आणि दुसरी वाढ जुलै ते डिसेंबर या दरम्यान होते, जी AICPI निर्देशांकाच्या डेटाद्वारे निर्धारित केली जाते. महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या पगाराची गणना करण्यासाठी ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सचा वापर केला जातो. सुमारे 90 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. महागाईनुसार सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते.

English Summary: 7th pay commission da will increase Published on: 23 June 2022, 10:17 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters