1. बातम्या

सोलापूरच्या बुलेट ट्रेनसाठी सहा तालुक्यांतील ७८४ एकर जमिनीचे भूसंपादन होणार

वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे आज जगभर रस्त्यांचे लोहमार्गाचे आणि आंतरराष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरलेले आहे.सध्या मंजूर झालेला मुंबई ते हैदराबाद ही बुलेट (हायस्पीड) ट्रेन  ही सोलापूर  जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील या सहा तालुक्यांतील एकूण ७८४ एकर जमीन ही भूसंपादित होणार आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
bullet train

bullet train

वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे आज जगभर रस्त्यांचे लोहमार्गाचे आणि आंतरराष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरलेले आहे.सध्या मंजूर झालेला मुंबई ते  हैदराबाद  ही  बुलेट (हायस्पीड) ट्रेन  ही सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील या सहा तालुक्यांतील एकूण ७८४ एकर जमीन ही भूसंपादित होणार आहे. ग्रामीण जमिनीच्या मूल्यांकनापेक्षा पाच पट जास्त, तर शहरासाठी अडीच पट जास्त भाव जमिनीला मिळणार आहे अशी माहिती जनसुनावणी वेळी देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 6 तालुक्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन चे पॉईंट्स:-

  1. मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन मार्ग - ६४९ किलोमीटर
  2. स्थानके - सोलापूर अन् पंढरपूरट्रेनची
  3. बुलेट ट्रेन प्रवासी क्षमता - ७५० प्रवासी
  4. बुलेट ट्रेन मध्ये कोच असणार - १० बाय १०
  5. बुलेट ट्रेन चे नियोजित स्पीड - ताशी ३०० किलोमीटर

बुलेट ट्रेन ची ही असणार स्थानके:

नियोजित मुंबई-हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेनच्या ६४० किलोमीटरच्या अंतरी मार्गावर नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद, हैदराबाद ही स्थानके होणार आहेत.या नियोजित मुंबई हैद्राबाद हायस्पीड बुलेट ट्रेन साठी सर्वाधिक जमीन ही पुणे जिल्हा  आणि  सोलापूर  जिल्ह्यातील काही  तालुक्यातील आहे. या  जमिनीसाठी  शासन  योग्य मोबदला सुद्धा देणार आहेत. ग्रामीण किंवा खेडोपाडी असणाऱ्या जमिनीला जमिनीच्या दरापेक्षा पाचपट किंमत देणार आहेत आणि शहरी भागात जमिनीच्या किमतीपेक्षा अडीच पट जास्त किंमत मिळणार आहे.

या नियोजित बुलेट ट्रेन महामार्गाला किती जमीन ही बाधित होणार आहे याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळणार आहे.या बुलेट ट्रेन चे काम लवकरात लवकर चालू होण्यासाठी विरोधी पक्षनेते तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, म्हाडा चे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर  यांना घेऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन सोलापूर च्या विकासाची गुढी उभारणार आहेत.

English Summary: 784 acres of land in six talukas will be acquired for the bullet train of Solapur Published on: 02 October 2021, 12:17 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters