अमेरिकन कृषी विभागाच्या मुंबई येथे फॉरेन एग्रीकल्चर सर्विसेस यांच्यामतेचालू वर्षी देशात 124 लाख हेक्टर कापूस लागवड झाली आहे. हे लाकूड झालेले क्षेत्र केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंदाजापेक्षा तीन टक्के अधिक आहे.तसेच मध्य आणि दक्षिण भारताचा विचार केला तर मध्यभारतात पावसामुळे कापूस योजनेमध्ये व्यत्यय आला होता.तर दक्षिण भारतात कापसाची वेचणी सुरू आहे.यावर्षीकापसाची मागणी वाढण्यामागे बरीच कारणे आहेत.
- एफएएस च्या मते या वर्षी भारतात कापसाचा वापर हा अंदाजे 333 लाख गाठी इतका होईल तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील मागणी कायम असून,सूत गिरण्यांची क्षमता वाढल्याने कापसाच्या मागणीची शक्यता अधिक आहे.
- तसेच सूत आणि कापडाला चांगली मागणी असल्यामुळे या उत्पादनांच्या निर्यातीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सुत, कापड आणि हातमाग उत्पादनांच्या निर्यातीत 46टक्के वाढ झाली आहे. तसेच या उत्पादनांची निर्यात मूल्य 74 टक्क्यांनी जास्त आहे.
- तसेच यावर्षी सुताचे दर वाढलेले असल्यामुळे तसेच आयात कापसावरील शुल्क त्यामुळे लहान कापड उद्योगांना कच्च्या मालासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत कापूस आवक वाढत नाही तोपर्यंत या उद्योगांनी प्रक्रिया बंद केली आहे. त्यामुळे भविष्यात हे उद्योग प्रक्रियेत उतरल्यास कापूस उदराला पुन्हा आधार मिळेल व वापरहीवाढेल.या वर्षी देशातील कापूस उत्पादन 68 टक्क्यांनी तर तयारकपड्यांचे उत्पादन 20 टक्क्यांनी वाढले आहे.
- एफ एएस ने या वर्षी देशातून 77 लाख गाठी कापूस निर्यात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
- बांगलादेश, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया मधून कापसाला मागणी वाढल्याने कापूस निर्यात ऑक्टोबर च्या तुलनेत नोव्हेंबर मध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत कापसाचे वाढलेले दर,फ्रेटच्या भाड्यात झालेली वाढ तसेच भारतीय कापसाचे स्पर्धात्मकदर यामुळे पार्टी कापसाला बांगलादेशमधून मागणी वाढत आहे. ऑक्टोबर मध्ये झालेल्या एकूण निर्यातीत पैकी तब्बल 56 टक्के कापसाची निर्यात एकट्या बांगलादेशात झाली आहे. वाढती मागणी आणि स्पर्धात्मक दर असल्याने कापूस निर्यात अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी देशातून कापसाची होणारी निर्यात 77 लाख गाठींवर पोहोचेल, असा तज्ञांचा अंदाज आहे.
( संदर्भ- उत्तम शेती)
Share your comments