नवी दिल्ली : महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी भुस्खलन झाले आहे, अनेकांच्या शेतातील पिके वाहून गेल्याने राज्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झाले आहे. अशावेळी केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतीसाठी 700 कोटींची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत याबाबतची माहिती मंगळवारी दिली
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्रसिंह तोमर यांनी महाराष्ट्राला देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती दिली. पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्राने 700 कोटी रुपये मंजूर केले आहेत, असे तोमर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत 700 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती तोमर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना ही मदत पीक विमा योजनेअंतर्गत ही मदत दिली जाईल, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.
हेही वाचा : या राज्यात मत्स्यपालनासाठी बिनव्याजी कर्ज, मत्स्य शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
महाराष्ट्र सरकारने नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जी माहिती केंद्राला दिली गेली. केंद्राने आतंर मंत्रालयीन समिती बनवली, समितीने राज्यातील अधिकाऱ्यासोबत दौरा केला. तो दौरा केल्यानंतर अहवाल गृहमंत्र्यांना देण्यात आला. तो अहवाल मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रासाठी 701 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाल्याचे नरेंद्र तोमर म्हणाले आहेत. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात तुफान पाऊस झाला. इतका पाऊस झाला की कोकणातल्या विविध शहरांत महापूर आला. गावंच्या गावं पाण्यात डुबून गेली. कित्येक घरांवर दरड कोसळल्या.
यामध्ये तब्बल 110 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे चिपळूण, खेडमध्ये मुसळधार पावसाने महापूर आला. लोकांची घरं पाण्याखाली गेली. सातारा सांगली कोल्हापूरमध्येही पावसाचा जोर होता. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर शहरात पाणी शिरले होते. अशात हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशार दिला आहे.
Share your comments