राज्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.त्यामुळेशेतकरी चिंताग्रस्त झाले होते. ज्याच्या बहुतेक भागात दुबार पेरणीचे संकट डोक्यावर उभे होते.
परंतु काही दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाने पुन्हा राज्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. राज्यात गेल्या काही दिवसात जवळजवळ सत्तर टक्के खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाले आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत असून कोकण विभागात मुसळधार पाऊस होत आहे.
तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर विभागात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तसेच नाशिक, पुणे आणि कोल्हापूर विभागात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
जर आपण कोकण विभागाचा विचार केला तर कोकण विभागात 4.42 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 0.98लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दिवसापासून पुरेसा पाऊस नसल्याने भात लावणी मंदावली आहे. परंतु आत्ता पावसाचे जोरदार आगमन झाल्याने भात लावलेला वेग आला आहे. नाशिक विभागामध्ये 21.19 लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून त्यापैकी 11.26 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे..
खाली आपण विभागनिहाय झालेल्या पेरण्या पाहू
- पुणे विभाग- लागवडीखालील खरीप क्षेत्र 8.67 लाख हेक्टर – आतापर्यंत 6.41 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण
- कोल्हापूर विभाग -8.03 लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र – त्यापैकी 6.73 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण.
- औरंगाबाद विभाग- एकूण 20.23 लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र -17.52 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण
- लातूर विभाग- एकूण 27.94 लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र – पैकी 24.28 लाख हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण.
- अमरावती विभाग- एकूण खरिपाचे क्षेत्र 32.24 लाख हेक्टर – पैकी 26.29 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण
- नागपूर विभाग - एकूण खरीप पिकाखालील क्षेत्र 19.26 लाख हेक्टर – पैकी 11.29 लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. असे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.
Share your comments