1. बातम्या

७० लाख शेतकऱ्यांना मिळाले किसान क्रेडिट कार्ड


शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या दरम्यान पेरणीसाठी ६२, ८७० कोटी रुपयांच्या कर्जासह बँकांनी ७०.३२ लाख किसान क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. केसीसीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध होते. शेतीची अवजारे, खते, खाद्य आदींची खरेदी कार्डद्वारे करता येते. आता १० ट्क्के रक्कम आपण घरगुती खर्चासाठीही वापरू शकतो. केसीसी धारकांना ४ टक्के व्याजदराने ३ लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळते.

जर आपण अजून किसान क्रेडिट कार्ड बनवले नसले आणि आपल्याला किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता. केसीसीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध होते. शेतीची अवजारे, खते, खाद्य आदींची खरेदी कार्डद्वारे करता येते. आता १० ट्क्के रक्कम आपण घरगुती खर्चासाठीही वापरू शकतो. केसीसी धारकांना ४ टक्के व्याजदराने ३ लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळते. जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सम्मान निधी या योजनेचे लाभार्थी असला तर आपल्याला किसान क्रेडिट कार्ड मिळवणे अगदी सोपे होईल.

सरकारने या योजनेला किसान क्रेडिट कार्डशी जोडले आहे. यामुळे कार्ड बनविण्याची प्रक्रिया फार जलद होईल.  जून महिन्याच्या अखेरीस अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विटवर किसान क्रेडिट कार्डविषयी माहिती दिली होती. आत्मनिर्भर पॅकेजच्या अंतर्गत २ लाख कोटी कर्जाच्या अंतर्गत ६२,८७० कोटी रुपयांच्या कर्जासह ७०.३२ लाख शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. विशेष म्हणजे सरकारने मे महिन्यात मासेमारी करणाऱ्या आणि पशुपालनाचे व्यवसाय करणाऱ्यांसह २.५ कोटी शेतकऱ्यांना केसीसी मार्फत २ लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा केली होती.

असा करा केसीसीसाठी अर्ज  - अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in/ वर जाऊन येथे किसान क्रेडिट कार्डचा  अर्ज डाऊनलोड करा. यात आपल्या शेतीची माहिती आणि पिकांची माहिती भरायची आहे. यासह आपण कोणत्याच बँकेतून किसान क्रेडिट कार्ड बनवले नाही असेही नमूद करावे लागेल. अर्ज भरल्यानंतर ते जमा करावे. यानंतर संबंधित बँकेतून आपल्याला किसान क्रेडिट कार्ड मिळेल. 

कोणते कागदपत्र लागतात - ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, वाहन चालकांचा परवाना, रहिवाशी पुरावा म्हणून  पासपोर्ट, आधारकार्ड, वाहनचालकांचा पुरवा हे कागदपत्र लागतात.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters