राज्यात यावर्षीही उसाचे जोरदार गाळप सुरू असून यंदा सहकारी व खासगी मिळून १८६ साखर कारखाने सुरू आहेत. या कारखान्यातून आतापर्यंत तब्बल ७ कोटी ८१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. ऊस गाळपात सुरुवातीपासून कोल्हापूरची आघाडी आहे. नगर विभाग चौथ्या क्रमांकावर आहे. यंदा आतापर्यंत ७ कोटी ९७ लाख क्किंटल साखरेचे यंदा उत्पादन झाले आहे.
अजून किमान दोन कोटी टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे.राज्यात यंदा ९४ सहकारी व ९२ खासगी असे १८० साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप केले जात आहे. दरवर्षी तुलनेत यंदा दोन कोटी टनांपेक्षा अधिक ऊस आहे. आतापर्यंत राज्यात ७ कोटी ८१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक १ कोटी ८८ लाख टन, त्यापाठोपाठ पुणे विभागात १ कोटी ७० लाख ६४ हजार, सोलापूर विभागात १ कोटी ६२ लाख ५७ हजार तर नगर विभागात १ कोटी १६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.
हेही वाचा : उसावरील प्रमुख रोग अन् व्यवस्थापन;व्यवस्थित व्यवस्थपनाने होईल फायदा
औरंगाबादला ६६ लाख नांदेडला ६९ लाख, अमरावतीला ५ लाख तर नागपूरला ३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात तब्बल ७ कोटी ९७ लाख क्किंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात दर दिवसाची गाळप क्षमता ८ लाख ६० हजार ९८० एवढी आहे. मात्र दर दिवसाला ५ लाख ४८ हजार ११२ टन उसाचे गाळप होत आहे. राज्याचा विचार केल्यास दर दिवसाला ऊस गाळप तीन लाख टनाने कमी होत आहे.
अजून साधारण दोन कोटी टन उसाचे गाळप होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
Share your comments