राज्य
राज्य सरकारच्या पीक विमा योजनेत आजपर्यंत ६६ लाख ५ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्या असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३१ जुलैपर्यंत आहे.
काय आहे एक रुपया पिकविमा योजना?
२०२३-२४ पासून सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रति अर्ज केवळ एक रूपया भरुन पिक विमा पोर्टलवर नोंदणी करायची आहे. उर्वरीत शेतकरी हिश्श्यातील रक्कम सर्वसाधारण विमा अनुदान समजून राज्य शासनामार्फत दिली जाणार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा केली होती.
या पीक योजनेचा लाभ कधी मिळेल?
१. प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान
२. हंगाम सुरु असताना प्रतिकूल हवामानामुळे झालेले पिकांचे नुकसान
३. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी उत्पान्नात घट (पावसातील खंड, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, पूर, भूस्खलन)
Share your comments