जे शेतकरी केंद्र व राज्य सरकारच्या यांत्रिकीकरण योजनांमधील सोडतीमध्ये पात्र ठरले आहेत अशा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात शेती अवजारांचे 65 कोटींपेक्षा जास्त अनुदान या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या यांत्रिकीकरण उप अभियानाचा महत्त्वाचा टप्पा राबविला जात असताना केंद्राने शेतकऱ्यांना अवजार खरेदीसाठी 129 कोटी पेक्षा जास्त अनुदान देऊ केले आहे. याशिवाय राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून यासाठी 70 कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे.
जर आपण दोन हजार वीस आणि बावीस या दोन वर्षांचा विचार केला तर या दोन वर्षांमध्ये तीनशे 15 कोटी रुपये उपलब्ध निधी कृषी विभागाच्या ताब्यात असून यापैकी जवळपास 71 टक्के निधी म्हणजे 240 कोटी रुपये शेतकऱ्यांना बँक खात्यात वर्ग करण्यात आलेले आहेत अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. यामध्ये 152 अवजार बँक सुरु करण्यात आलेल्या असून 360 अवजार बँक उघडण्यासाठी अनुदान उपलब्ध करण्यात आले आहे
152 अवजार बँक उघडण्यात आले आहेत त्यांना अनुदान देखील देण्यात आले आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना साठी सर्व जिल्ह्यांना अनुदान दिले जाते.
नक्की वाचा:अतिरिक्त उसाचे अनेकांनी केले सोने, कारखान्यावर चकरा न मारता कमवले लाखो, जाणून घ्या कसे...
परंतु अजूनही काही जिल्ह्यांनी या योजनेला प्रतिसाद दिलेला नसून महाराष्ट्र मध्ये यावर्षी नगर जिल्हा पहिल्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी अनुदान उपलब्ध आहे परंतु वाटप कमी झालेले आहे यासाठी कृषी आयुक्तालयाकडून संबंधित जिल्ह्याकडे पाठपुरावा केला जात आहे. मध्ये गेल्या आठवड्यात 60 ते 65 कोटींची रक्कम वाटण्याच्या प्रक्रियेत होती.
परंतु मार्च महिन्याच्या नंतर या वाटप प्रक्रियेत आणखी वाढ होईल. जिल्ह्यांसाठी उपलब्ध झालेले अनुदान शिल्लक राहणार नाही यासाठी काळजी घेतली जात आहे असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे.
Share your comments