पुणे धरण साखळीत ६२% पाणीसाठा; शेतीसाठी अजून हवे पाणी
पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत ६२% पाणीसाठा झाला असून, त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. परंतु शेतीसाठी पाण्याचा प्रश्न अजून मिटला नाही.
पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत ६२% पाणीसाठा झाला असून, त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. परंतु शेतीसाठी पाण्याचा प्रश्न अजून मिटला नाही. त्यासाठी धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याची आवश्यकता आहे. दरम्यान यावर्षी पुणे विभागातील सर्वात मोठे प्रकल्प यावर्षी रिकामीच आहेत. खडकवासला धरणसाखळीत, पानशेत, वरसगाव, टेमाघर आणि खडवासाला ही धरणे येतात. या धरणांची एकूण क्षमता २९ टीएमसी आहे. आजपर्यंत या चारही धरणात १८. १३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या पाण्यामुळे पुणेकारांची वर्षाची पाण्याची व्यवस्था झाली आहे. परंतु शेतीसाठी धरणे पूर्ण भरायची गरज आहे. जुलै महिना कोरडा गेल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसानं जोर धरला आहे. दोन आठवड्यांपूर्वी पुणे महानगरपालिकेने पाणीकपात लागू केली होती. आता पाऊस पडल्यनानंतर पुणेकरांचा जीव भांड्यात पडला आहे.
English Summary: 62% water storage in Pune dam chain; more water needed for agriculturePublished on: 12 August 2020, 06:50 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments